Homeशहरकल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा नागरी सत्कार होणार

कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा नागरी सत्कार होणार

  • : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते ठराव मंजूर

कल्याण दि. १६ : कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण  डोंबिवली  महापालिकेच्या महासभेत महायुतीच्या नगरसेवकांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला असून तो आज सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

गेल्या दशकभरात कल्याण लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा आणि नागरी विकासाच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना मिळाली आहे. मेट्रो, सिमेंट काँक्रीट रस्ते, रिंग रोड, उड्डाणपूल यांसारख्या मोठ्या प्रकल्पांसह विविध नागरी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची भावना महासभेत व्यक्त करण्यात आली. या कामांमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था, नागरी सुविधा आणि एकूणच विकास प्रक्रियेला गती मिळाल्याचे नगरसेवकांनी नमूद केले.

महासभेत शिवसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे आणि उपमहापौर राहुल दामले यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव मांडत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीचा गौरव केला. या प्रस्तावाला शिवसेना तसेच भाजपच्या नगरसेवकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला. सभागृहातील अनेक सदस्यांनी चर्चा करताना कल्याण लोकसभेत झालेल्या विविध विकासकामांचा उल्लेख करत खासदार शिंदे यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे, विश्वनाथ राणे, अस्मिता मोरे, माया कांबळे यांच्यासह भाजपचे नगरसेवक वरुण पाटील, मंदार हळबे, दिपेश म्हात्रे आणि दया गायकवाड यांनी अभिनंदन प्रस्तावाला अनुमोदन देत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले.

दरम्यान, कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे वरिष्ठ नगरसेवक निलेश शिंदे यांनी सभागृहात बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नागरी सत्काराची सूचना मांडली. या सूचनेचे सभागृहातील सर्व सदस्यांनी स्वागत केले. त्यानंतर महापौर ॲड. हर्षाली थविल-चौधरी आणि उपमहापौर राहुल दामले यांनीही समर्थन देत नागरी सत्काराचा ठराव अधिकृतरीत्या मंजूर केला. या ठरावामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा लवकरच नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भाजपचे माजी नगरसेवक बाबा मिसाळ 2013 च्या खुनाचा प्रयत्न प्रकरणातून निर्दोष सुटले.

पुणे : सहकारनगर पोलिसात 2013 मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील भाजपचे माजी नगरसेवक दीपक उर्फ ​​बाबा मिसाळ आणि सहा सहआरोपींची सत्र न्यायालयाने गुरुवारी...

सीबीआयच्या मुंबई युनिटने आयआरएस दाम्पत्यावर ४.६ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे

मुंबई: सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) च्या मुंबई युनिटने IRS अधिकारी जोडप्याविरुद्ध 4.6 कोटी रुपयांच्या 'बेकायदेशीर संवर्धना' प्रकरणी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला...

पुणे पोलिसांनी 5 वर्षात 130 बांगलादेशींना हद्दपार केले

पुणे : गेल्या पाच वर्षांत पुणे शहर पोलिसांनी 130 बांगलादेशी नागरिकांना हद्दपार केले असून, त्यापैकी 53 जणांना गेल्या तीन महिन्यांत परत पाठवण्यात आले आहे.पोलिस...

आयपीएल 2026: ‘तो खास आहे, सहमत आहे की नाही’- आर अश्विनचा निर्णय रियान पराग...

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग (एएनआय फोटो) रियान परागने सर्वात महत्त्वाचे असताना डिलीव्हरी केली, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 90 धावा करून टीकाकारांना शांत केले, रविचंद्रन...

सकाळ वि संध्याकाळ; आपल्या शरीरासाठी काय चांगले कार्य करते?

योगासने अनेकदा पहाटेशी जोडले जाण्याचे एक कारण आहे. शरीर ताठ होऊन जागृत होते, मन शांत होते आणि लक्ष विचलित होते. सकाळची सत्रे रीसेट बटणासारखी...

error: Content is protected !!