- बांदोडकर सायन्स कॉलेज व इंजिनिअरिंग कॉलेजचा अनोखा उपक्रम.
ठाणे दि.७ : ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाचे बांदोडकर सायन्स कॉलेज व इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन निमित्त एक राखी, सीमेवरील सैनिक भावांसाठी हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

बांदोडकर सायन्स कॉलेज व इंजिनिअरिंग कॉलेजचे एनसीसी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी ३७५ राख्या प्राचार्या डॉ.विंदा मांजरमकर,ऍड.प्रमोद ढोकळे,ऍड.डॉ.दिलीप पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच रविंद्र दळवी,एनसीसी कॅप्टन प्रा.बिपीन धुमाळे,राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयक डॉ.सायली दप्तरदार व उमालक्ष्मी पटणे,प्रभारी तुषार मोहिते-पाटील,प्रा.प्रज्ञा बोडके व सेवानिवृत्त प्रा.प्रकाश माळी यांच्या उपस्थितीत आम्ही शिवभक्त परिवार या संस्थेकडे सुपूर्द केल्या.आम्ही शिवभक्त परिवार या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष दिपेश दळवी यांच्या माध्यमातून जगातील सर्वात उंच आणि उणे ४६ तापमान असणाऱ्या सियाचीन सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिक भावांना सदर राख्या पोहचविण्यात आल्या.





























