Homeशहरउल्हासनगर महापालिकेत मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण (SIR) बाबत आढावा बैठक संपन्न

उल्हासनगर महापालिकेत मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण (SIR) बाबत आढावा बैठक संपन्न

उल्हासनगर दि ८ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision-SIR) सध्या युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बुधवारी उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभा सभागृहात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मा. श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण, तहसीलदार श्रीम. कल्याणी कदम, सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, नायब तहसिलदार कुमावत, सहा. आयुक्त गणेश शिंपी आणि सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि निर्देश :

कामाचा आढावा : मतदार याद्यांमधील प्रोजन्सी मॅपिंग, लोकसंख्या शास्त्रीयदृष्ट्या समान नोंदींची (DSE) पडताळणी, अस्पष्ट व मानवी नसलेल्या छायाचित्रांची (Blurred & Non-Human) शुद्धीकरणाची प्रक्रिया आणि ‘फोटो सिमिलर एन्ट्रीज’ (PSE) या कामांचा प्रत्यक्ष प्रगती अहवाल तपासण्यात आला.

दोन दिवसांची डेडलाईन : सर्व केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणाचे उर्वरित काम पुढील दोन दिवसांत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे, असे सक्त निर्देश तहसीलदार श्रीम. कल्याणी कदम यांनी दिले.

घरोघरी भेटीवर भर : प्रोजन्सी मॅपिंगसाठी बीएलओनी प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन अचूक माहिती संकलित करावी. तसेच, पर्यवेक्षकांनी (Supervisors) बीएलओना तांत्रिक मदत करून कामाची टक्केवारी वाढवण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

ज्या बीएलओंची कामगिरी समाधानकारक नाही किंवा ज्यांच्या कामाची टक्केवारी अत्यंत कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. “अशा कर्मचाऱ्यांवर तात्काळ एफआयआर (FIR) दाखल करण्यात येईल आणि तशी नोंद त्यांच्या सेवापुस्तकात (Service Book) केली जाईल,” अशी सक्त ताकीद अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण यांनी बैठकीत दिली. सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी बैठकीचा समारोप करताना नमूद केले की, मतदार यादी अद्ययावत करण्याचे हे काम अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी हे काम पूर्ण गांभीर्याने, सातत्याने आणि अचूकतेने पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन

पुण्यातील 3 वर्षीय बलात्कार-हत्या प्रकरण: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर प्रचंड आंदोलन पुणे : तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर शनिवारी पुण्यातील शेकडो आंदोलकांनी...

‘युनिफॉर्ममध्ये तू सेवेत आहेस’: ट्रॅफिक जॅममध्ये महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांना घेरणारी मोटारचालक तिची...

मुंबई : आरक्षण आंदोलनादरम्यान 21 एप्रिल रोजी झालेल्या वाहतूक कोंडीवरून मंत्री गिरीश महाजन यांच्याशी भिडणाऱ्या संतप्त महिलेची ओळख शनिवारी समोर आली. वरळी...

नसरापूर बलात्कार-हत्या: मुख्यमंत्र्यांनी फास्टट्रॅक खटला चालवण्याचे आश्वासन दिले, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पुणे: भोर जिल्ह्यातील नसरापूरजवळ तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या कथित बलात्कार आणि खूनाची घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह असल्याचे वर्णन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

थॉमस कप: फ्रान्सने भारताला बाद केले

किदाम्बी श्रीकांत (इमेज क्रेडिट: BAI) थॉमस चषक स्पर्धेत फ्रान्सची आघाडी सुरू आहे. ग्रुप स्टेजमध्ये 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाला नॉकआउट केल्यानंतर, फ्रान्सने तिन्ही...

1969 मध्ये, डोनाल्ड फिशरला योग्य जीन्स तंदुरुस्त शोधण्यात अडचणी आल्याने गॅपची निर्मिती झाली |

1969 मध्ये, डोनाल्ड फिशरला सुस्थितीतील जीन्स सापडल्याने निराश झाल्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने तरुणांच्या बाजारपेठेसाठी एक स्टोअर केटरिंगची स्थापना केली. फोटो क्रेडिट्स: Instagram/@gapinc...

error: Content is protected !!