Homeशहरउल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती व ९ विशेष समिती सभापती पदासाठी नामनिर्देशक पत्र...

उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती व ९ विशेष समिती सभापती पदासाठी नामनिर्देशक पत्र दाखल : सर्वांचीच बिनविरोध निवड झाल्याचे निश्चित

उल्हासनगर दि १५ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती व ९ विशेष समिती सभापती”पदासाठी नामनिर्देशन पत्र बुधवारी उल्हासनगर महापालिका सचिव अनंत जावद्वार यांच्याकडे दाखल करण्यात आले. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पदांची निवड बिनविरोध झाल्याचा स्पष्ट झाले आहे.

स्थायी समिती सभापती पदासाठी सहोता कलवंत सिंग यांनी अर्ज दाखल केला तसेच सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदासाठी श्रीम. दुधानी दिप्ती नवीन,नियोजन व विकास समिती सभापती पदासाठी श्रीम. मिनाकौर अजितसिंग लबाना,पाणी पुरवठा व जलः निसारण समिती सभापती पदासाठी दीपा नारायण पंजाबी, आरोग्य परिक्षण व वैद्यकिय सहाय्य समिती सभापती पदासाठी श्रीम सविता प्रवीण तोरणे, माध्यमिक शिक्षण व पूर्व प्राथमिक शिक्षण समिती सभापती पदासाठी श्रीम. साक्षी संदिप सुर्वे, गलिच्छ वस्ती व निर्मुलन समिती सभापती पदासाठी श्री विपुल दत्ताराम मयेकर, क्रिडा समाज कल्याण व सांस्कृतिक समिती सभापती पदासाठी श्रीम.प्रीती विनोद मखिजा, महिला व बाल कल्याण समिती सभापती पदासाठी श्रीम. मिना दिपक सोंडे, तर महसूल समिती सभापती पदासाठी श्रीम. प्रेरणा अजित माखिजानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने सर्व पदांची निवड बिनविरोध झाल्याचा स्पष्ट झाले आहे.

त्यावेळी महापौर अश्विनी कमलेश निकम, उपमापोर अमर लुंड, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राजेश वधारीया, शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी , शिवसेना गटनेते अरुण आशान, मनोज लासी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांच्या बिनविरोध निवडीमुळे महापालिकेच्या कारभारात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यावेळी गोपाळ लांडगे म्हाणाले  महापालिकेच्या नियमाप्रमाणे महापौर, उपमहापौर निवडीनंतर आता स्थायी समिती आणि ९ इतर विशेष समित्या यांच्या सभापतीची आज निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची वेळ होती, सर्वांनी वेळेमध्ये फॉर्म दाखल केले आहेत, शिवसेनेला ५ विशेष समित्या आणि भाजपाला ४ समित्या  मिळाल्या आहेत .याप्रमाणे फॉर्म भरण्यात आले आहेत. निश्चितपणे ५ वर्षांमध्ये सर्वांना संधी मिळेल त्यामुळे पहिल्याच वर्षी सगळ्यांना अपेक्षाप्रमाणे संधी मिळालेली नाही. ही जरी वस्तुस्थिती असली तरी सर्वांनाच ज्या कमिटी आहेत त्याप्रमाणे सर्वांना संधी मिळणार आहे आणि या महापालिकेचे कामकाज समितीच्या माध्यमातून यापुढे अधिक गतीने निश्चित होईल असे सांगितले,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबईतील मेट्रो-लाईन 6 च्या कामासाठी, फूट ओव्हरब्रिजसाठी पश्चिम रेल्वे रात्रभर ब्लॉक घेते

मुंबई: राम मंदिर ते जोगेश्वरी दरम्यान मेट्रो लाईन-6 साठी स्टील गर्डरचे लोकार्पण आणि दहिसर येथील दोन फूट ओव्हरब्रिजसाठी गर्डर बसवणे यासह पायाभूत...

महाराष्ट्र मंडळ 1 मे पासून डुप्लिकेट प्रमाणपत्र अर्ज पूर्णपणे ऑनलाइन हलवत आहे

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने जाहीर केले आहे की डुप्लिकेट मार्कशीट, उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि स्थलांतर प्रमाणपत्रांचे अर्ज 1...

LSG vs KKR लाइव्ह स्कोअर, IPL 2026: KKR ने परत-परत विजय मिळविल्याने LSG हा...

LSG vs KKR लाइव्ह स्कोअर, IPL 2026: नमस्कार आणि TimesofIndia.com वर LSG vs KKR च्या लाईव्ह कव्हरेजमध्ये तुमचे स्वागत आहे. लखनौ सुपर जायंट्स स्वतःला...

‘ही ऑटो सीएनजी किंवा पेट्रोलवर नाही, ती निव्वळ करुणेवर चालते’: कर्नाटक ऑटो ड्रायव्हरच्या मिनी...

वेगवान दिवस आणि सतत फोन वापरण्याच्या मधल्या काळात, कर्नाटकातील एक छोटीशी गोष्ट शांतपणे लोकांची गती कमी करत आहे. आता व्हायरल होत असलेला...

पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने भोजनालय मालकाचा मृत्यू

पुणे : बिबवेवाडी-लुल्लानगर रस्त्यावर शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास टँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने एका भोजनालय मालकाचा मृत्यू झाला.अनिल सीताराम आल्हाट (४७, रा. मार्केट यार्ड)...

error: Content is protected !!