Homeशहरउल्हासनगरात धक्कादायक घटना : जिवंत असणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांनी केले मृत्यू...

उल्हासनगरात धक्कादायक घटना : जिवंत असणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांनी केले मृत्यू घोषित

झालेली चूक रुग्णालय प्रशासनाने मान्य करत केली दिलगिरी व्यक्त

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरात  राहणाऱ्या एका वयोवृद्ध इसमाची प्रकृती अचानक खालवल्याने त्याला उल्हासनगरातील शिवनेरी या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला रुग्णाबाहेरच तपासून त्या जिवंत असणाऱ्या रुग्णाला मृत घोषित करत त्याच्या नातेवाईकांना डेट सर्टिफिकेट देखील दिले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरून खाजगी रुग्णालयाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरातील कॅम्प  नंबर ४  परिसरात ६५ वर्षीय अभिमान तायडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. ते आजारी असल्यामुळे त्यांच्यावर जे. जे रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी तायडे कुटुंबीयांना अभिमान यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले मेन रिपोर्ट्स आल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही असे सांगितल्यावर अभिमान तायडे यांना त्यांच्या कुटुंबीयांनी घरी आणले होते . ते घरी असताना अचानक अभिमान यांची प्रकृती बिघडली. त्यांचा मुलगा सचिन यांनी वडील अभिमान यांना त्वरित रिक्षाने  उल्हासनगरातील कॅम्प नंबर ४  परिसरात असणाऱ्या शिवनेरी या खाजगी रुग्णालयात नेले . रुग्णालय बाहेर रिक्षा उभी असताना शिवनेरी रुग्णालयाचे डॉक्टर प्रभू आहूजा यांनी रुग्णालय बाहेर येऊन रिक्षातच अभिमान यांना तपासले. अभिमान हे मयत झाले आहे असे  त्याच्या कुटुंबीयांना सांगितले. अभिमान यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरी आणून ठेवले. अंतिम संस्काराची तयारी देखील सुरू करण्यात आली. पण अचानक त्यांचा मुलगा सचिन यांनी आपल्या वडिलांकडे पाहिले असता. त्यांचे श्वास सुरू असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी त्वरित वडील अभिमान यांना उल्हासनगरातील क्रिटीकेअर हॉस्पिटल मध्ये नेले. त्यातील डॉक्टरांनी अभिमान यांच्यावर त्वरित उपचार सुरू केल्यावर अर्धा तासातच ते ठणठणीत बरे होऊन बसले. याशिवाय ज्या शिवनेरी डॉक्टरांनी अभिमान यांना मृत घोषित केले होते व आधार कार्ड घेऊन या त्यांना डेट सर्टिफिकेट आपण देऊ असे सांगितले होते. त्या रुग्णालयात जाऊन अभिमान यांचे डेट सर्टिफिकेट देखील ते घेऊन आले. यावरून या खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांचा कारभाराबाबत संतापाचे वातावरण पसरले आहे . ज्यावेळी तायडे कुटुंबीयांनी अभिमान हे जिवंत असल्याचे आणि त्यांच्यावर क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे डॉक्टर प्रभू यांना सांगतात. त्यांनी आपली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली. जर तायडे कुटुंबियांनी या डॉक्टरवर विश्वास ठेवला असता आणि पुढची प्रक्रिया केली असती तर काय प्रकार घडला असता याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. खरंतर अशा डॉक्टरांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे संतप्त नागरिकांकडून बोलले जात आहे. दुसरीकडे ज्या डॉक्टरांनी आपल्या वडिलांना मृत घोषित केले होते. आणि वेळेस आपण वडिलांना दुसरा रुग्णालयात उपचारासाठी नेले त्यामुळे आज आपले वडील सुखरूप आहेत असे मत सचिन यांनी व्यक्त केले. सध्या अभिमान यांच्यावर उपचार सुरू असून ते ठणठणीत बरे झाले आहेत. या घटनेमुळे उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली असून. जिवंतपणीच डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित करून मृत्यूचा दाखला कसा दिला. डॉक्टरने खरंतर पूर्ण खात्री करायला हवी होती. खाजगी रुग्णालयातील डॉक्टर रुग्णाच्या जीवाशी कसा खेळ करतात या घटनेवरून दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याबाबत शिवनेरी रुग्णालयाचे डॉक्टर प्रभू आहुजा यांना विचारले असता त्यांनी सांगितले जे  पेशंटला रिक्षामध्ये घेऊन आले होते. रिक्षा ही रुग्णालयाच्या बाहेर उभी होती. रुग्ण अर्धा तासापासून बेशुद्ध होते. मी त्याची रिक्षामध्ये तपासणी केली असता मला हॉट आणि साऊंड मिळाले नाही. पेशंट श्वास पण घेत नव्हता. तोंडामधून लाळ गळत होती. पेशंटची ही अवस्था पाहून मी त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये जिथे व्हेंटिलेटर आहे त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते पेशंटला घरी घेऊन गेले. याशिवाय पेशंटला दुसरे पण आजार होते. अर्धा एक तासापासून घरी बेशुद्ध होते. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांना वाटलं की पेशंटचा श्वास चालतोय म्हणून त्यांनी पेशंटला जिथे व्हेंटिलेटर आहे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये नेले. त्या ठिकाणी पेशंटचा श्वास चालत होता. त्यांची शुगर देखील खूप कमी झाली होती. कधी कधी पेशंटची शुगर कमी झाली तर हार्ड बीट कमी होऊन जाते असे डॉक्टर प्रभू यांनी सांगितले. याशिवाय आमच्याकडे पेशंटला रिक्षा मधून आणल्यानंतर रिक्षा ही बाहेर उभी होती आणि त्यात  पेशंट बसला होता. बाहेर रस्त्यावर कन्स्ट्रक्शन काम चालू असल्यामुळे आम्हाला तपासणी दरम्यान त्याचा हार्ट आणि साऊंडचा आवाज आला नाही. दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर तो बरा झाला. त्यानंतर त्या रुग्णाचे नातेवाईक आमच्या रुग्णालयात आले आणि त्यांनी आमच्याकडे डेट सर्टिफिकेटची मागणी केली. त्यांनी आम्हाला सांगितलं नाही की पेशंट जिवंत झाला आहे किंवा बरा झाला आहे. त्यांनी आम्हाला ट्रॅप केला आणि आमच्याकडे सर्टिफिकेट मागितले. माणुसकीच्या दृष्टिकोनातून मी देखील त्यांना डेट सर्टिफिकेट देऊन टाकले. नंतर त्या लोकांकडून आम्हाला कळालं की पेशंट जिवंत आहे आणि उपचार सुरू आहेत. त्यानंतर मी पेशंटच्या नातेवाईकांना सॉरी म्हणून सांगितले  आमच्याकडून चूक झाल्याचे मान्य करत दिलगिरी व्यक्त केली. अशी आपली बाजू शिवनेरीच्या डॉक्टरांनी मांडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

2,004 कॉल, 238 तास आणि 1 अंतिम ‘सिग्नल’: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळावर केतन अग्रवालच्या...

पुणे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे की रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूमागील कथित षडयंत्र अनेक महिन्यांच्या गुप्त संवाद, अनेक बैठका आणि त्यांना...

19 चौकार, 6 षटकार! वैभव सूर्यवंशीचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी याने धडाकेबाज शतक ठोकले

वैभव सूर्यवंशी आणि त्यांचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी नवी दिल्ली : क्रिकेट हे सूर्यवंशी कुटुंबात चालत असल्याचे दिसते. सराव सामन्यात शतक झळकावल्यानंतर काही...

‘बंद ठेवण्यास सांगितल्यावर अपमानास्पद वाटले’: मुंबई लोकलमध्ये दरवाज्यावरील रांग कशी झाली जीवघेणी; प्रवाशाच्या पोटात...

आरोपी रोशन सुवर्णा (एल) मुंबई : मंगळवारी रात्री चर्चगेट-नालासोपारा ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात दरवाजा बंद ठेवण्यावरून झालेल्या वादातून मुसळधार पावसात घरी परतणाऱ्या 21...

सिया गोयलचा दुसरा प्रयत्न: लोहगड हत्येपूर्वी केतन अग्रवालचा पासपोर्ट फाडला, महिलांच्या वॉशरूममध्ये टाकला

चेतन चौधरी (एल), सिया गोयल (सी), केतन अग्रवाल (आर) पुणे: रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात टाकून दिलेला पासपोर्ट, हजारो फोन कॉल्स आणि कथित...

प्राचीन देवी आणि त्यांच्या शक्तिशाली अर्थांनी प्रेरित 10 सुंदर लहान मुलींची नावे

प्राचीन देवींनी प्रेरित केलेली नावे केवळ सौंदर्यापेक्षा अधिक देतात. त्यांच्यात धैर्य, शहाणपण, लवचिकता, करुणा आणि नेतृत्वाच्या कथा आहेत. ही नावे शतकानुशतके टिकून आहेत कारण...

error: Content is protected !!