Homeशहरउल्हासनगरातील कुर्ला कॅम्प येथे ड्रेनेज प्रकल्पासाठी ठेवलेले पाईप जळाले; सरकारी निधीच्या सुरक्षेवर...

उल्हासनगरातील कुर्ला कॅम्प येथे ड्रेनेज प्रकल्पासाठी ठेवलेले पाईप जळाले; सरकारी निधीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

उल्हासनगर दि.८ ( प्रमोद दळवी )  : नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी मलनिसरण विभागामार्फत महाराष्ट्र प्राधिकरण यांच्या मोकळ्या भूखंडावर ठेवण्यात आलेले पाईप त्या ठिकाणी जळालेल्या अवस्थेत दिसून आल्याने उल्हासनगरात एकच खळबळ उडाली आहे. या पाईपांना आग नेमकी कशामुळे लागली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कोणीतरी जाणून-बुजून या पायपांना आग लावली असावी असे देखील बोलले जात आहे.

उल्हासनगरातील कॅम्प नं- ५ येथील कुर्ला कॅम्प, शिव मंदिर रोड येथील महाराष्ट्र प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावर मलनिस्सारण विभागामार्फत नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी आवश्यक असलेले मोठ्या आकाराचे पाईप संबंधित भूखंडावर साठवून ठेवण्यात आले होते. मात्र, आज सकाळी या ठिकाणी पाहणी केली असता संबंधित पाईप पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती नियाझ अन्सारी आणि  ॲड प्रशांत चंदनशिव यांनी सिटी प्रोजेक्ट ऑफिसर पंकज जाधव यांना दूरध्वनीद्वारे दिली.

या घटनेमुळे सरकारी कामांमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाईपांना आग नेमकी कशी लागली, ही दुर्घटना होती की कोणीतरी जाणून-बुजून हा प्रकार केला आहे का याचा तपास होणे आवश्यक असल्याची मागणी सर्वत्र केली जात आहे. जळालेले मोठे पाईप हे डीडब्ल्यूसीचे होते.दोन किलोमीटर पर्यंत ड्रेनेज लाईन  टाकण्यासाठी त्या ठिकाणी आणून ठेवण्यात आले होते., सरकारी निधीतून खरेदी करण्यात आलेल्या साहित्याची अशा प्रकारे झालेली हानी ही चिंतेची बाब असून संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगरसेविका मीना सोंडे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक कार्ड व शासकीय दाखले शिबिर संपन्न

उल्हासनगर दि. ८ ( प्रमोद दळवी )  : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक शासकीय दाखले सहज उपलब्ध व्हावेत तसेच ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड मिळविण्याची प्रक्रिया...

इस्रायली हल्ल्यात गाझाच्या अर्जेंटिना-इजिप्त फिफा विश्वचषक स्क्रिनिंग आयोजक किकऑफपूर्वी ठार

पॅलेस्टिनींनी अर्जेंटिना आणि इजिप्त यांच्यातील नुसेरात, मध्य गाझा पट्टी (डावीकडे) येथे विश्वचषक फेरीच्या 16 सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहिले आणि लिओनेल मेस्सी इजिप्तच्या मोहनाद...

मुसळधार पावसानंतर मुंबईतील सात तलावांना महिनाभराचा पाणीपुरवठा एकाच दिवसात झाला मुंबई बातम्या

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईच्या पाणीसाठ्यात झपाट्याने सुधारणा झाली असून,...

पुण्यात मुसळधार पावसात इमारत कोसळून १६ जण अडकल्याची भीती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी (WTE) प्लांटमधील मोशी येथील तीन मजली प्रशासकीय इमारत बुधवारी मुसळधार पावसात कोसळलीImage Credit: TNN पुणे : मोशी येथील...

मानसशास्त्रज्ञ-मंजूर पालकत्वाचा आजचा कोट: “मुलांसाठी, खेळ हे गंभीर शिक्षण आहे. हे बालपणीचे काम आहे.”

मानसशास्त्रज्ञ-मंजूर पालकत्वाचा आजचा कोट: "मुलांसाठी, खेळ हे गंभीर शिक्षण आहे. हे बालपणीचे काम आहे." आजचे बालपण नेहमीपेक्षा जास्त वेळापत्रकबद्ध झाले आहे. शाळा, शिकवणी,...

error: Content is protected !!