ठाणे दि.३ : २ मे २०२५ रोजी क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. नाम.अशोकजी उइके , मा.श्री.हेमंतजी सावरा (खासदार पालघर), मा. संजयजी केळकर (आमदार ठाणे), मा.वैभवराव पिचड(माजी आमदार),मा. निरंजन डावखरे (आमदार कोकण विभाग), मा. भोसले मॅडम (ठाणे सेंट्रल जेल अधिक्षीका), डॉ. व्ही. व्ही.पोपेरे आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन,श्री.किरकिरे (सामाजिक कार्यकर्ते), दत्तात्रय भूयाळ, लकीभाऊ जाधव(राष्ट्रीय युवा अध्यक्ष), गोविंद साबळे (पुणे जिल्हा अध्यक्ष), डॉ. सुपे, श्री हंसराज खेवरा (श्रमिक संघटना ठाणे), दिलीप पटेकर, निसरट सर,दिगंबर नवाळे, पी. सी. झांबाडे (लेखक), डॉ.पराड, श्री अशोक इरनक (सामाजिक कार्यकर्ते), संजय भांगरे(माजी सरपंच),श्री. राजेंद्र भांगरे, चेतन मेमाने (मुंबई युवा अध्यक्ष),साठे सर, अर्जुन बांबरे सर सौ.अनिता बांडे ताई, भांगरे ताई, हिले ताई, सगबोर ताई, साबळे ताई, झांबाडे ताई, सदर मान्यवर समाज बांधव विविध संघटनांचे पदाधिकारी ठाणे, पुणे, नगर, नाशिक, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातून आलेले होते .

समज बांधव यांनी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना विनम्र अभिवादन केले.आदिवासी विकास मंत्री यांनी आपल्या भाषणात समाजाच्या मागणीनुसार राघोजी भांगरे यांची स्मृती व त्यांचे क्रांतिकारी काम व इंग्रजाबरोबर सावकार शाही विरोधी दिलेला लढा व समाजाला दिलेले संरक्षण हे काम पाहता आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे मध्यवर्ती कारागृह ठाणे असे नामकरण करण्याचे महाराष्ट्र सरकारकडे मागणी करणार असल्यचे आश्वासन आदिवासी मंत्र्यांनी दिले तसेच खा.हेमंत सावरा यांनी आपल्या भाषणात राघोजी भांगरे यांच्या नावाचा धडा शालेय अभ्यास क्रमात यावा अशी विनंती प्रशासनाला केली तसेच आमदार संजय केळकर साहेब यांनी व मा.आ.निरंजन डावखरे यांनी ठाणे कलेक्टर चौक राघोजी भांगरे यांचा पुतळा उभारण्याचे आश्वासन आदिवासी समाज बांधवांना दिले.हा आदर्श घेऊन नव्या पिढीने काम करावे असे सर्वच कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व राघोजी भांगरे यांना अभिवादन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचलन लकी भाऊ जाधव यांनी केले आणि आभार प्रदर्शन रामनाथ भोजने यांनी केले..





























