Homeशहरअखेर शांतीनगर स्मशानभूमीतील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा बेकायदेशीर पुतळा हटवला: राज असरोंडकर यांच्या...

अखेर शांतीनगर स्मशानभूमीतील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा बेकायदेशीर पुतळा हटवला: राज असरोंडकर यांच्या लढ्याला यश

उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील लोकवर्गणीतुन विनापरवाना उभारलेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात यावा या मागणीसाठी शहरातील राजकीय पक्ष सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व शहरातील आंबेडकरी अनुयायी महापालिकेकडे पाठपुरावा करीत होते. तसेच विविध आंदोलने ही केली होती. व गेल्या सहा दिवसापासून कायद्याने वागा लोक चळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर हे बेमुदत आमरण उपोषणाला बसले होते. अखेर महापालिकेने सोमवारी शांतीनगर स्मशानभूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणाहून हटवला.

उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी करत आंबेडकरी अनुयायींनी यांनी नुकताच उल्हासनगर रेल्वे स्टेशन (पूर्व) बाहेर काळ्या फिती लावून मुकनिदर्शने केली होती. पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास हे आंदोलन आगामी काळात अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा ऍड. कल्पेश माने यांनी दिला होता. शांतीनगर स्मशानभूमी कॅम्प  -३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा बेकायदेशीरपणे बसवला गेला होता.त्याच्या यथोचित परवानग्यां सहित, इतरत्र सुरक्षित व शोभनीय जागेत स्थलांतरणाकरिता अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि आंबेडकरी अनुयायी सनदशीर मार्गाने प्रशासना कडे पाठपुरावा करत होते . परंतु, मनपा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालया कडून कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे कायद्याने वागा संघटनेचे राज असरोंडकर यांनी पुतळा हटविण्यासाठी उपोषण सुरू केल्यावर, प्रशासनाकडून सूत्र हलले.

गेल्या महासभेत लक्षवेधी सूचनेद्वारे वंचित बहुजन पक्षाच्या गटनेत्यांनी पुतळा हटविण्याची मागणी केली. मात्र महापौर अश्विनी निकम यांनी वंचित बहुजन पक्षाची लक्षावेधी सूचना फेटाळल्याने, त्यांच्या विषयी सर्वत्र संताप व्यक्त झाला होता . शहरांतील आंदोलनाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेत, महापालिका आयुक्ताना पत्र पाठवून आपलेस्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. अखेर सोमवारी शांतीनगर स्मशानभूमितीला डॉ आंबेडकर यांचा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला. असरोंडकर यांच्या आंदोलनाला अखेर यश आले असून महापौर अश्विनी निकम, आमदार डॉ. बालाजी किणीकर . शिवसेना.गटनेता अरुण आशान, शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, रिपाईचे शहराध्यक्ष नाना बागुल, ,किरण सोनावणे, काँग्रेसचे रोहित साळवे,समाजसेवक शिवाजी रगडे यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी असरोंडकर यांची भेट घेऊन, त्यांच्या आंदोलनाची सांगता केली. पुतळा हटविण्याच्या निमित्ताने शहरांत आंबेडकरी समाज एकवटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल : चौघांचीही बिनविरोध निवड , अधिकृत...

उल्हासनगर दि . २९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या  चार प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. महायुतीच्या वाटपानुसार शिवसेना...

‘आमच्याद्वारे नियुक्त नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावात वकील आशुतोष...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर 300 मध्ये उपविजेता ठरला सु ली-यांगकडून पराभव पत्करावा लागला...

किदाम्बी श्रीकांत (एएफपी फोटो) नवी दिल्ली: भारताचा किदाम्बी श्रीकांत यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत चिनी तैपेईच्या सु ली-यांगकडून...

‘उल्लंघनावर कठोर कारवाई’: महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची...

दादा भुसे म्हणाले, "मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे." मुंबई : महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी...

लोहगड हत्येपूर्वी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या ‘सराव सत्रा’चा पुणे पोलिस तपास करत...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येपूर्वी लोहगड किल्ल्यावर "सराव सत्र" झाले होते. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालची कथितपणे हत्या करण्यापूर्वी, सिया आणि...

error: Content is protected !!