Homeशहरअखेर ती कचराकुंडी उल्हासनगर महानगरपालिकेने हटवली

अखेर ती कचराकुंडी उल्हासनगर महानगरपालिकेने हटवली

  • समाजसेवकाच्या प्रयत्नाला यश

 उल्हासनगर दि. ६ ( प्रमोद दळवी ) : ज्या मैदानात अनेक राजकीय, सांस्कृतिक तसेच क्रीडा महोत्सव कार्यक्रम संपन्न होतात. त्या मैदानालगतच व नागरी वस्तीत असलेली कचराकुंडी समाजसेवकाच्या पाठपुराव्याने उल्हासनगर महानगरपालिकेने हटवल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

उल्हासनगरातील कॅम्प नंबर ४ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील सुभाष टेकडीत सिद्धार्थ स्नेह मंडळ येथे मैदान आहे. हे मैदान खूप जुने असून त्या मैदानाच्या परिसरात मोठ्या संख्येने लोक वस्ती आहे.त्या मैदानात अनेक राजकीय सांस्कृतिक तसेच क्रीडा महोत्सवचे कार्यक्रम होत असतात. या मैदानात लहान मुलांसह वयोवृद्ध देखील फेरफटका मारत असतात. पण गेल्या अनेक वर्षापासून मैदाना लगतच परिसरातील राहणारी लोक व दुसऱ्या वस्तीतील नागरिक रस्त्यावर कचरा टाकत होते. हळूहळू त्या ठिकाणाला कचरकुंडूचे स्वरूप येऊ लागले. नंतर त्या ठिकाणी पालिकेने कचराकुंड्या ठेवल्या. त्यात कचराकुंड्यात नागरिक कचरा टाकू लागले. एकंदरीत आता त्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचू लागले होते. रोज पालिकेची कचरा उचलणारी  गाडी येऊन साचलेला कचरा घेऊन जात असे. पण रोज त्या ठिकाणी साचत असलेल्या कचरामुळे त्या लोकवस्ती परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरू लागले होते. एकंदरीत या कचरकंडिमुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. याशिवाय सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे साचत असलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी पाणी देखील तुंबत होते.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत होती. ही समस्या वंचित बहुजन आघाडी उल्हासनगरचे उपाध्यक्ष व समाजसेवक  महेंद्र अहिरे ( माही ) यांना दिसून येताच त्यांनी परिसरातील काही नागरिकांशी चर्चा केली.  महेंद्र  यांनी उल्हासनगर महानगरपालिकेला ती कचरकुंडी त्या ठिकाणी हटवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला. उल्हासनगर महापालिका विभागातील आरोग्य विभाग तसेच स्वच्छता निरीक्षक यांच्याशी महेंद्र अहिरे यांनी पाठपुरावा करून ही समस्या त्यांच्या लक्षात आणून दिली. पालिकेने देखील ही कचराकुंडी भर वस्तीत आणि मैदानाच्या ठिकाणी असल्यामुळे ती कचरकुंडी कायमस्वरूपी त्या ठिकाणाहून हटवण्यात आली. याशिवाय पालिकेने त्या ठिकाणी सूचना फलक लावले आहे. सदर ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये कचरा टाकताना आढळल्यास आपणा विरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सूचना फलक लावल्याने नागरिकांनी त्या ठिकाणी कचरा टाकने बंद केल्याने तो परिसर स्वच्छ दिसू लागला आहे. याशिवाय आता त्या ठिकाणाहून दुर्गंधी देखील बंद झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. केवळ समाजसेवक महिंद्र अहिरे यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी असलेली कचरकुंडी पालिकेने हटवल्याने नागरिकांनी त्यांचे मनापासून आभार प्रकट केले आहेत.

एका समाजसेवकाने आपला परिसर स्वच्छ आणि निरोगी राहावा याकरिता पालिकेशी पाठपुरावा करून ती दुर्गंधीयुक्त कचरकुंडी त्या ठिकाणाहून हटवण्याचे काम केल्याने खरंतर त्या समाजसेवकाचे आभार प्रकट नागरिकांनी करायला हवे. पण काही अज्ञात नागरिक परत त्या ठिकाणी कचरा आणून टाकत असतात इतकेच नव्हे तर रात्री मध्यरात्री त्या ठिकाणी कचरा टाकून पळतात असतात असे समाजसेवक महेंद्र अहिरे यांच्या निदर्शनात आले आहे. निदान अशा नागरिकांना आपला परिसर स्वच्छ आणि निरोगी राहावा असे वाटत नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विराट कोहलीने मोडला रिकी पाँटिंगचा विक्रम, सर्वकालीन टॉप-फाइव्ह एलिट यादीत प्रवेश | क्रिकेट बातम्या

भारताचा विराट कोहली (ANI फोटो) विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या चमकदार कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड जोडला आणि ऑस्ट्रेलियन महान रिकी...

NITI आयोगाच्या अहवालात व्यापक पर्यटन सुधारणांची अपेक्षा आहे; हॉटेलची वाढ मंदावणारी नियामक अडथळे |...

नवीन NITI आयोग अहवाल हॉटेल प्रकल्प आणि पर्यटन वाढीला गती देण्यासाठी जलद मंजूरी आणि सोप्या नियमांची शिफारस करतो (प्रतिनिधित्वात्मक हेतूंसाठी AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा)...

‘निराधार कथा तरंगणे थांबवा’: FDA ने मसाल्यांचे दुकान सील केल्यानंतर सिया गोयलच्या वडिलांचा छळाचा...

प्रवीण गोयल (एल) यांचा दावा आहे की FDA ने त्यांचे दुकान निलंबित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनावश्यक छळाचा सामना करावा लागला. पुणे: महाराष्ट्राच्या अन्न...

लोक त्यांच्या खिडकीत धातूचा चमचा का ठेवत आहेत? व्हायरल युक्तीमागील विज्ञान |

खिडक्यांवर घनीभूत होणे ही बऱ्याच घरांमध्ये एक सामान्य समस्या आहे, विशेषत: थंडीच्या महिन्यांत जेव्हा उबदार घरातील हवा थंड काचेला भेटते. हे एक...

मुंब्रा परिसरातील निर्घृण हत्येचा उलगडा : ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे मुंडके व हात...

उल्हासनगर दि. १६ ( प्रमोद दळवी )  : मुंब्रा परिसरात एका तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करून त्याची ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे मुंडके धडापासून...

error: Content is protected !!