Homeशहर८५ कोटींच्या विकासकामांना स्थगिती देण्याची विरोधी पक्ष नेत्या अंजली साळवे यांची मागणी

८५ कोटींच्या विकासकामांना स्थगिती देण्याची विरोधी पक्ष नेत्या अंजली साळवे यांची मागणी

उल्हासनगर दि. ९ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत विविध योजनांमधून मंजूर करण्यात आलेल्या सुमारे ८५ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी पक्ष नेत्या अंजली साळवे यांनी या सर्व कामांना तत्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने पारदर्शक पद्धतीने निविदा मागवाव्यात आणि संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महानगरपालिकेला विविध योजनांतर्गत ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठीची निविदा प्रक्रिया नुकतीच मंजूर करण्यात आली आहे. मात्र, ही प्रक्रिया काही विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळावा या उद्देशाने घाईघाईने पूर्ण करण्यात आल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे. स्थायी समितीची स्थापना होण्यापूर्वीच या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती विविध प्रसारमाध्यमांमधून समोर आल्याने महापालिकेच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्ष नेत्या अंजली साळवे यांच्या म्हणण्यानुसार, या विकासकामांसाठी काही संस्थांनी अंदाजित खर्चापेक्षा तब्बल २० टक्के कमी दराने निविदा सादर केल्या होत्या असे सांगण्यात येत आहे,. अशा परिस्थितीत कमी दराच्या निविदा स्वीकारून महापालिकेचा आर्थिक फायदा होऊ शकत असताना त्या नाकारून पुन्हा निविदा मागविण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला.

याशिवाय, स्थायी समिती गठित करण्याची प्रक्रिया सुरू असतानाही संबंधित विकासकामांना समितीसमोर न मांडता थेट मंजुरी देण्यात आल्याने प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रकरणामुळे महापालिकेच्या प्रतिमेला धक्का बसत असून प्रशासनाच्या पारदर्शकतेबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर सर्व मंजूर निविदा रद्द करून नव्याने पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवावी, संबंधित प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करावेत, तसेच कथित गैरव्यवहार आणि घोटाळ्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी अंजली साळवे यांनी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व निविदा प्रक्रिया आणि विकासकामांना तत्काळ स्थगिती देण्यात यावी, अशीही त्यांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाच गोल, एक लाल कार्ड: एस्टाडिओ अझ्टेकामध्ये इंग्लंड विरुद्ध मेक्सिको फेरीच्या 16 ने टीव्ही...

रविवारी, 5 जुलै, 2026 रोजी मेक्सिको सिटी येथे मेक्सिको आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषक फेरीच्या 16 सॉकर सामन्यात दुसरा गोल केल्यानंतर इंग्लंडचा ज्युड बेलिंगहॅम...

महा सरकारने UCC मसुद्यासाठी निवृत्त SC न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन केली

मुंबई : एकसमान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने पहिले पाऊल टाकले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांत त्याच्या...

विषारी वायू, अस्थिर इमारत मोशी बचावात अडथळा

मोशी बचाव कार्य पुणे : मोशीतील टन कचऱ्याच्या दरम्यान कोसळलेल्या इमारतीत अडकलेल्या सात लोकांसाठी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणारे अनेक बचाव...

हजारो वर्षे जुने आणि अजूनही मजबूत उभे आहेत: जगातील सर्वात शक्तिशाली किल्ल्यांच्या आत

अलेप्पोचा किल्ला, सीरिया (इमेज क्रेडिट: कॅनव्हा) युगानुयुगे, किल्ले सामर्थ्य, सहनशक्ती आणि अपवादात्मक अभियांत्रिकी पराक्रमांचे स्मारक मानले गेले आहेत. राज्यांचे रक्षण करण्यासाठी, व्यापार मार्गांचे...

अखेर उल्हासनगर महापालिकेची सुसज्ज अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली : मात्र ७ दिवसात अभ्यासिका पूर्ण क्षमतेने...

उल्हासनगर, दि. ९ ( प्रमोद दळवी )   : उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्रमांक १७ परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेली सुसज्ज शैक्षणिक अभ्यासिका अनेक महिन्यांपासून सुरू न...

error: Content is protected !!