Homeशहरहर घर तिरंगा २०२६’ मोहिमेत फाळणी दिवस प्रदर्शन व कँडल मार्चचे आयोजन

हर घर तिरंगा २०२६’ मोहिमेत फाळणी दिवस प्रदर्शन व कँडल मार्चचे आयोजन

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा २०२६’ मोहिमेअंतर्गत शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधू भवन, उल्हासनगर-२ येथे ‘फाळणी दिवस प्रदर्शन व कँडल मार्च’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापालिका आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश फाळणीच्या काळातील वेदनादायी घटना, नागरिकांचे विस्थापन, त्याग आणि संघर्ष यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, तसेच राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ करणे हा होता.

सिंधू भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या फाळणी दिवस प्रदर्शनाला १८ शाळांमधील एकूण ५८८ विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी भेट दिली. प्रदर्शनामध्ये फाळणीच्या काळातील ऐतिहासिक घटना, छायाचित्रे आणि विविध माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देत इतिहासातील या अत्यंत वेदनादायी पर्वाची माहिती जाणून घेतली. या उपक्रमासाठी कार्यक्रमाला साजेशी आकर्षक रांगोळी सुरक्षा अधिकारी दशरथ जयस्वाल यांनी साकारली. त्यांच्या या कलाकृतीने कार्यक्रमस्थळी विशेष वातावरण निर्माण झाले. दरम्यान, सायंकाळी फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून फाळणीतील दिवंगत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. कँडल मार्चच्या माध्यमातून फाळणीतील हुतात्मा नागरिकांच्या स्मृतींना उजाळा देत शांतता, एकता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.

या कँडल मार्चमध्ये क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती श्रीमती प्रीती विनोद माखीजा, उपायुक्त (जनसंपर्क) श्रीमती स्नेहा करपे, जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी, सहायक आयुक्त  गणेश शिंपी,  विनोद माखीजा, तसेच बचत गटातील महिला आणि महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. फाळणी दिवस प्रदर्शन आणि कँडल मार्चच्या माध्यमातून इतिहासातील या वेदनादायी पर्वाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मता, शांतता, बंधुभाव आणि देशप्रेमाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. या उपक्रमाची माहिती उल्हासनगर महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बदलापूर पुर्व येथील सोनार यांची दागिन्यांची फसवणूक करून अपहार करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा घटक...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : बदलापूर पूर्व परिसरातील आपटेवाडी रोड येथील मोरया ज्वेलर्स तसेच त्यांच्याकडे दागिने घेऊन आलेल्या ग्राहकांची फसवणूक करून...

उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांना वाढदिवसानिमित्त राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी दिल्या शुभेच्छा

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : प्रजा कृपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख...

मध्यवर्ती रुग्णालयात पहिली एंडोस्कोपिक सेप्टोप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी : उल्हासनगरच्या आरोग्यसेवेत अत्याधुनिक सुविधेची भर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील वैद्यकीय सेवांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय...

‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत उल्हासनगरमध्ये भव्य बाईक रॅली : राष्ट्रभावनेचा जागर

उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी ) : ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण व्हावी, देशप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी तसेच राष्ट्रीय ध्वजाबद्दल...

एक हात मदतीचा सामाजिक संस्थेच्या मागणीला यश ; महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश व...

उल्हासनगर दि.१३ ( प्रमोद दळवी )  : शाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटूनही उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्य...

error: Content is protected !!