Homeताज्या बातम्याशिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची आखाती आणि आफ्रिकी देशांच्या दौऱ्यासाठी निवड

शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची आखाती आणि आफ्रिकी देशांच्या दौऱ्यासाठी निवड

  • शिवसेनेच्या युवा नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता
  • जागतिक व्यासपीठावर देशाची बाजू मांडणार.
  • संसदेचे सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे प्रमुख देशांना भेटी देणार

 ठाणे दि . १७ :  ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने आपल्या दहशतवादविरोधी भूमिकेचा स्पष्ट संदेश   जगाला दिला आहे. आता या धोरणाचा प्रचार आणि आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी भारताची सर्वपक्षीय ७ वेगवेगळी शिष्टमंडळे जगभर दौर्‍यावर जात आहेत. यामध्ये शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची आखाती आणि आफ्रिकी देशांच्या दौऱ्यासाठी निवड  करण्यात आली असून ही पक्षासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

या शिष्टमंडळांचे नेतृत्व हे अनुभवी नेते करणार आहेत. यात शशी थरूर (INC) अमेरिका आणि युरोप, रवी शंकर प्रसाद (BJP), संजय कुमार झा (JDU), बिजयंत पांडा (BJP), कनिमोझी करुणानिधी (DMK), सुप्रिया सुळे (NCP) मध्यपूर्व, आणि श्रीकांत एकनाथ शिंदे (शिवसेना) आखाती आणि आफ्रिकी देशांचे नेतृत्व करणार आहेत. ही शिष्टमंडळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख देशांना भेटतील. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादाविरोधातील ठाम भूमिका जगासमोर मांडली असून, आता ही भूमिका आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट करण्यासाठी संसदेचे सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे प्रमुख देशांना भेटी देणार आहेत. १७ मे २०२५ रोजी संसदीय कार्य मंत्रालयाने याची घोषणा केली.

ऑपरेशन सिंदूर, ज्याने ७ मे २०२५ रोजी पहलगाम हल्ल्याला (२६ मृत्यू) प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, याने भारताची शून्य सहिष्णुता धोरण जगासमोर ठेवले. आता ही शिष्टमंडळे भारताची दहशतवादविरोधी कृती आणि राष्ट्रीय एकमत यांचा संदेश जगभर पोहोचवतील. प्रत्येक गटात अनुभवी राजकारणी आणि कूटनीतिज्ञांचा समावेश आहे, जे भारताची बाजू प्रभावीपणे मांडतील. डॉ. श्रीकांत शिंदे हे केवळ तरुण नेता नाहीत, तर दूरदृष्टी असलेले, अभ्यासू आणि प्रामाणिक राजकारणी आहेत. १०० अब्ज डॉलर हून अधिक व्यापार आणि ८० लाख भारतीय कामगार या भागात कार्यरत असल्याने, भारतासाठी ही कूटनीतिक संधी अत्यंत महत्त्वाची आहे. डॉ. श्रीकांत शिंदे हे संयमित, मुद्देसूद संवाद आणि व्यापक समजूतदारपणा भारताच्या भूमिकेला अधिक प्रभावीपणे मांडतील. त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन आणि कूटनीतिक कौशल्य भारताला मजबूत आधार देईल. तसेच या दौऱ्याने भारताची जागतिक प्रतिमा बळकट होईल आणि दहशतवादाविरोधी लढ्याला नवे परिमाण मिळेल.

आज शिवसेनेला डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने नव्या पिढीचं नेतृत्व मिळालं आहे, जे जागतिक मंचावर देशासाठी बोलायला तयार आहे. दहशतवादाविरोधातील भारताची शून्य सहिष्णुता धोरण, जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे  आणि हे धोरण डॉ. श्रीकांत शिंदे या तरुण नेत्यानं पुढे असणे ही काळाची गरज होती. ते यातून स्पष्ट होईल, हे नक्की. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर  ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी  सोपवल्याबद्दल त्यांनी माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकार यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्याने पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजला 6% व्याजासह रु.1.04L जादा शुल्क परत करण्यास सांगितले

पुणे: राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाने शहरातील आयएलएस लॉ कॉलेजला एका विद्यार्थ्याला 6% व्याजासह 1.04 लाख रुपये परत करण्याचे निर्देश दिले आहेत, कारण...

मराठी प्राविण्य नियमः १५ लाख ऑटो चालकांनी ४ मे पासून राज्यभर आंदोलनाची योजना आखली...

मुंबई: ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन, ऑटो चालकांची सर्वात मोठी संघटना, सोमवारी 4...

ज्येष्ठ नागरिक मालमत्ता कर सवलत संदेश खोटा: PMC

पुणे : पुणे महानगरपालिका (पीएमसी) वृद्धांना मालमत्ता करात ३० टक्के सवलत देत असल्याच्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजवर त्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन नागरी...

IPL 2026: कोण आहे दानिश मलेवार? MI च्या २१ वर्षीय नवोदित खेळाडूने GT विरुद्ध...

नरेंद्र मोदी स्टेडियमवर 2026 च्या हंगामातील लढतीत 21 वर्षीय दानिश मालेवारने गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केल्याने मुंबई इंडियन्ससाठी एक नवीन नाव चर्चेत...

बराक ओबामा यांनी दिलेला दिवसाचा यशस्वी कोट: “हताश न वाटण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे…” |

तुम्ही कधी शंकेच्या रिकाम्या भिंतीकडे टक लावून बघितले आहे का आणि काही बदलेल का असा विचार केला आहे का? बराक ओबामांचे शब्द...

error: Content is protected !!