- स्थलांतरित निर्णयाला विरोध दर्शवत लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी दिल्या स्वाक्षरी
उल्हासनगर दि ३० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर कॅम्प ४ आणि ५ मधील नागरिकांच्या हक्काचे शिधावाटप कार्यालय (४०-फ) स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्वासात न घेतल्यामुळे हजारो सामान्य कुटुंबांना आता अंबरनाथ किंवा कल्याणला हेलपाटे मारावे लागणार आहेत.अतिरिक्त प्रवास खर्च आणि वेळेचा अपव्यय थांबवण्यासाठी हे कार्यालय जैसे थे’ ठेवण्यात ‘यावे तसेच प्रशासनाने जनहिताचा विचार करून हा निर्णय त्वरित सुधारित करावा ह्या करिता उल्हासनगर -५ शिधा वाटप कार्यालय येथे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पुढाकारणे बैठक पार पडली तसेच स्थलांतरित निर्णयाला विरोध दर्शवत सर्व उपस्थित लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या सहीने देण्यात आला.

यावेळी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहर प्रमुख रमेश चव्हाण, उपशहर प्रमुख परशुराम पाटील, महिला शहर संघटक सौ. मनीषा भानुशाली, नगरसेवक सुरज सोनकांबळे, प्रदीप गोडसे, शेखर यादव, मा. नगरसेविका समिधा कोरडे, महिला पदाधिकारी स्मिता चिखलकर मयुरी शिंदे, सीमा पडाळे, पुष्पा गेनू गजरमल, शिवसेनेचे ज्ञानेश्वर करवंदे, राजू घडवतील, राजू पाटील, राजू चिकणे, संजय कुच्चवारी, प्रकाश भंडारी, गोविंद पारधे, विलास जामदार, कृष्णा वाघमारे, गणेश शिंदे, राजू वाळंज, सिद्धांत चव्हाण, चेतन दास, संजीव कांबळे,गणेश चौगुले,गणपत पानसरे,निरंजन दास तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.





























