उल्हासनगर दि.३१( प्रमोद दळवी ): वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पुर्व यांच्यातर्फे दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यासाठी विविध परिसरातून विद्यार्थी आले होते. यावेळी अनेक तरुणांनी मुलाखती दिल्या.त्यांच्या उद्या विविध ठिकाणी थेट मुलाखती साठी पाठविण्यात आले आहे. तसेच काही अंतिम निवड मुलाखतीनंतर होणार आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा नेते सारंग थोरात,शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे,वनदेव पळसपगार, शहाजी खंडागळे,वॉर्ड अध्यक्ष सुरेंद्र गायकवाड,माजी नगरसेवक शांताराम निकम,समाजसेवक भीमा गायकवाड,गणेश डोके इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर उपक्रम महेंद्र अहिरे (माही) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. यावेळी PNC ManPower Supply Company भिवंडी तसेच Maple Consultancy मुंबई यांचे HR उपस्थित होते.





























