Homeशहरलक्ष्मी म्युझिकल स्टुडिओमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना मानवंदना

लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना मानवंदना

मुंबई दि. १७ : “भारतमातेचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने जात-धर्म विसरून एकत्र येणे हीच काळाची गरज आहे,” असा संदेश देत, भारतीय स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओ’च्या वतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओचे संचालक सन्माननीय रामजी दादा डोडीया, सौ. लक्ष्मी डोडीया, काफिल अन्सारी, रुची पाटील, सचिन परब, अँड.विजय सातपुते आणि डॉ. मंगेश पेडामकर यांनी केले होते.

कार्यक्रमाची सुरुवात केक कापून आणि तिरंग्याला वंदन करून झाली. उपस्थितांनी देशासाठी बलिदान दिलेल्या अमर हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून भावपूर्ण मानवंदना अर्पण केली. या सोहळ्यात स्टुडिओमधील गायक आणि गायिकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांची मैफल सजवली. या गीतांनी वातावरणात देशप्रेमाचा संचार केला आणि उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या मनात देशाभिमानाची ज्योत प्रज्वलित केली. या विशेष प्रसंगी गायक-गायिकांसह अनेक मान्यवर अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आवर्जून उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या या उत्सवामागील मुख्य उद्देश स्पष्ट करताना आयोजकांनी सांगितले की, “आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्या हुतात्म्यांचे स्मरण करून, प्रत्येक भारतीयामध्ये राष्ट्रप्रेम जागृत ठेवणे आणि भारतमातेच्या ऋणात राहून तिची सेवा करणे, हाच आमचा मूळ हेतू आहे.” देशभक्तीच्या या चैतन्यमय वातावरणात आणि कलाकारांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : शिवसेना शहरप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त भुल्लर परिवाराच्या वतीने भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे...

उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या नशेखोर टोळीचा धुडगूस; ३ कारसह मालवाहू रिक्षाची तोडफोड

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर-३ मधील सेक्शन १७ येथील बाबा थरिया सिंगजी  दरबार जवळ असलेल्या उद्यान परिसरात सोमवारी सायंकाळी सुमारे...

खरगे यांच्या सभास्थळाच्या ‘शुद्धीकरणा’चा उल्हासनगर काँग्रेसकडून तीव्र निषेध; आंबेडकर चौकात निषेध मोर्चा व सत्याग्रह

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे झालेल्या सभेनंतर काही उजव्या...

बुक ऑफ लाइफ चर्चमध्ये रक्तदान शिबिर : चर्च सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नाशिक दि. १७ ( संदीप गायकवाड  )  : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नाशिक येथील बुक ऑफ लाइफ चर्चच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानवसेवा...

पवित्र श्रावण मासातील पहिल्या श्रावणी सोमवारी महादेवाचे मनोभावे दर्शन

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : पवित्र श्रावण मासातील पहिल्या श्रावणी सोमवारी अंबरनाथ येथील प्राचीन व ऐतिहासिक शिवमंदिरात भक्तिमय वातावरणात भगवान महादेवाची...

error: Content is protected !!