Homeताज्या बातम्यामहागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा आक्रोश 

महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा आक्रोश 

  1. महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा आक्रोश

– या देशाची अर्थव्यवस्थाच धारातीर्थ पडली आहे – ऋताताई आव्हाड

– दुचाकी आडवी पाडून जोरदार निदर्शने

ठाणे – वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळविण्यात राज्य आणि केंद्र सरकारला अपयश येत आहे. दिवसेंदिवस खाद्यतेल, इंधन, सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार ॠताताई आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांच्या उपस्थितीत दुचाकी आडवी करून जोरदार निदर्शने करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढू लागले आहेत. तेल, धान्य, कडधान्य, घरगुती गॅस, इंधन यांचे दर गगनाला भिडत आहेत. मात्र, त्याचे कोणतेही सोयरसुतक सरकारला नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात , गाड्या घ्या..! सायकली द्या; महागाई कशासाठी..! गद्दारांच्या सोयीसाठी; 50 खोके महागाई OK; महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी; बहुत हो गयी महंगाई की मार, चलो हटाये मोदी सरकार; सरकार खाते पेट्रोल वर दलाली.. डायन झाली महागाई; भ्रष्ट झाले सरकार.. म्हणून झाला महागाईचा हा हा कार , अशा घोषणा दिल्या.

याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना ॠताताई आव्हाड यांनी, इथे दुचाकी आडवी पाडून आंदोलन करण्यात आले आहे. मात्र, या देशाची अर्थव्यवस्थाच धारातीर्थ पडली आहे. आपल्या देशातील महागाई कमी करण्याचे कोणतेही धोरण आखले जात नाही. आता महागाई कमी करण्यासाठी जनतेने काय करावे, हे तरी सरकारने सांगायला हवेय. आपल्या देशाने अमेरिकेच्या टेरिफ धोरणावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही. आपले नेतृत्व अमेरिकेला घाबरते की काय, हे माहित नाही. मात्र, हे सरकार भूमिकाच घेत नसल्याचे दिसून येत आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे या देशातील अल्पभूधारक शेतकरी मृत्युपंथाला लागले आहेत. त्याचे कोणतेही सोयरसुतक या सरकारला नाही, असे सांगितले.

सुहास देसाई यांनी, सध्या पेट्रोल आणि डिझेलवर कंपन्यांकडून प्रति लिटर 15 रुपयांची बक्कळ कमाई होत आहे तर, सामान्यांच्या खिशातून राजरोस लूट केली जात आहे; सध्या कच्या तेलाच्या किंमती चार वर्षांच्या निचांकी पातळीवर आहे. तरी सरकार पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवून जनतेच्या पैशांची लूट करत आहे, अशी टीका केली. तर, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी, हे सरकार आम्हा महिलांना बावळट समजत आहे. महिलांना पंधराशे रूपये देऊन मते विकत घेतली आहेत. हे सरकार “नोट फाॅर वोट” चे आहे. या सरकारने आजवर महागाईबद्दल कोणतेही धोरण आखलेले नाही. त्यामुळेच आम्ही हे आंदोलन जनतेचे प्रतिनिधी म्हणून करीत आहोत. आजचे आंदोलन प्रातिनिधिक आहे. यापुढे आमचे आंदोलन हे अधिक तीव्र असणार आहे, असे सांगितले. या आंदोलनात मर्जिया पठाण, प्रभाकर सिंग, सुरेंद्र उपाध्याय, अॅड. कैलास हावळे, गजानन चौधरी,राजु चापले, प्रफुल कांबळे, जतीन कोठारे, उमेश अग्रवाल, राजेश कदम, संतोष नागले, माधुरी सोनार, राजेश ज. साटम, शशिकला पुजारी, कमर जान मुलानी, पुजा खान, संतोष तिवारी, शुभम द्विवेदी, संतोष साटम, दिलीप लोखंडे, राहुल ठाणेकर, कैलास सुरकर, प्रविण सिंह, एकनाथ जाधव, समीर नेटके, विशांत गायकवाड, इक्बाल शेख, शिवा कालूसिंह, मंगेश गायकवाड, मेहरबानो पटेल , ज्योती निम्बर्गी , मीना ओव्हळ, वंदना लांडगे , शुभांगी कोळपकर, रेश्मा भानुषाली, लता ताई ढाकर , सुजाता कदम , मल्लिका पिल्ले , मनीषा पटेल, बेबीका नंदा, हिराबाई गोहिल, मंजुबाई गोहिल, सुचिता पवार प्रीती सुळे, जयश्री अहिरे , ताराबाई इस्ले, मेघा गवते , सोनाली कदम , संगीता लोकरे , मनीषा पाटील, मीना माने , स्नेहल चव्हाण, अजित मोरे, केतन जेधे, महेश भाग्यवंत, हिरु गंगावाशी, धर्मंद्र अस्थाना, पद्माकर पाटील, समाधान माने, राहुल भालेराव, शेखर भालेराव, वैभव खोत, वसीम खान, हरिवंश चव्हाण, विक्रम सिंह, किरण पवार, दिगंबर गरुड, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलीस हवालदाराला धमकावल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

पुणे : मांजरी येथील 29 वर्षीय मोटारसायकलस्वाराने पहाटे 5.30 च्या सुमारास एफसी रोडवर बेदरकारपणे मोटारसायकल चालविल्याने डेक्कन जिमखाना पोलिसांनी बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे...

बीसीसीआय सूर्यकुमार यादवला पुढील निवड बैठकीसाठी न बोलावण्याची शक्यता आहे

सूर्यकुमार यादव (पीटीआय फोटो/कुणाल पाटील) नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) सूर्यकुमार यादवच्या T20I संघातील भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी गोंधळात पडणार आहे. TOI मार्चमध्ये...

एमएलसी निवडणुका: प्रमुख महामंडळ आणि पॅनेल नियुक्त्यांसाठी बंडखोरांचा विचार करू, महा भाजप प्रमुख |...

मुंबई : 18 जून रोजी होणाऱ्या 16व्या द्विवार्षिक आणि एका पोटनिवडणुकीसाठी महायुतीने बुधवारी 17 एमएलसी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. संयुक्त पत्रकार...

रोबोटिक सहाय्याने कमीतकमी हल्ल्याची शस्त्रक्रिया संधिवाताचा हृदयरोग असलेल्या महिलेला प्रक्रियेनंतर फक्त 3 दिवसांनी चालणे,...

डॉ आशिष बाविस्कर रोबोटिक सहाय्यक मिनिमली इनवेसिव्ह मिट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट करत आहेत पुणे : संधिवाताच्या हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या 46 वर्षीय महिलेला रोबोटिक सहाय्यक...

आजची स्पॅनिश म्हण: “पुरुष जे करू शकतो ते करतो; स्त्री ते करते…” |

दिवसाची स्पॅनिश म्हण (प्रतिमा: AI-व्युत्पन्न) काही सुविचार गूढ गुंफून येतात. इतर सरळ मुद्द्यापर्यंत पोहोचतात. ही स्पॅनिश म्हण दुस-या श्रेणीतील आहे. "पुरुष जे करू...

error: Content is protected !!