Homeशहरमनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन कदम यांच्यासह उल्हासनगरात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे शिवसेना एकनाथ...

मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन कदम यांच्यासह उल्हासनगरात मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश

उल्हासनगर दि १२ ( प्रमोद दळवी ) : नुकताच उल्हासनगर मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे उल्हासनगर शहर प्रमुख कैलास तेजी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याची घटना ताजी असताना आता मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन कदम यांच्यासह उल्हासनगरातील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने या भव्य इनकमिंगमुळे शिवसेनेची ताकद आणखीन मजबूत झाली आहे. आगामी काळात जनतेच्या विश्वासाला न्याय देत विकासाची गती अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प शिवसेनेने केला आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व गटनेता अरुण आशान यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरमध्ये शिवसेनेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन कदम यांच्यासह,शैलेश पांढव( मनसे उल्हासनगर शहर उपाध्यक्ष ), दीपक सावंत (विभाग अध्यक्ष ), उपेंद्र परब (उपविभाग अध्यक्ष),मोहित बेहरानी (उपविभाग अध्यक्ष),नीलेश गुरव (उपविभाग अध्यक्ष ),हेमंत शिंदे ( शाखा अध्यक्ष ),अथर्व शिंदे (शाखा अध्यक्ष),लक्ष्मीकांत गुप्ता ( शाखा अध्यक्ष),ज्ञानेश्वर सावळे ( शाखा अध्यक्ष ),वैभव भोसले ( उपशाखा अध्यक्ष ) या सर्वांचा शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यात आला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या सर्वांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेत जनसेवा आणि विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे . त्यावेळी  नगरसेवक चंद्रशेखर यादव, सौ. साक्षी संदीप सुर्वे, विभागप्रमुख संदीप सुर्वे, शाखाप्रमुख परेश मलबारी व पदाधिकारी उपस्थित होते. या भव्य इनकमिंगमुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढली असून, आगामी काळात जनतेच्या विश्वासाला न्याय देत विकासाची गती अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

सचिन कदम यांनी सांगितले निवडणुकी दरम्यान, मतदारांना आम्ही शब्द दिला होता. आम्ही प्रभागाचा विकास करणार आणि आमच्या शब्दावर विश्वास ठेवून मतदारांनी आम्हाला भर भरून मतदान केले. परंतु काही मतांच्या फरकाने आमचा पराभव झाला. परत निवडणुकी करिता, मतदारांना पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे. पण प्रभागाचा विकासाला का वाट पाहावी लागावी. मतदारांना दिलेला शब्द पूर्ण करता यावा, प्रभागाचा विकास व्हावा यांकरिता मी व माझ्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. असे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘माझ्या कुटुंबाशी सामना करण्यापेक्षा केतनला मारणे सोपे होते’: सिया गोयलचा पुणे पोलिसांना धक्कादायक खुलासा

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

एनबीएचा पुढील शोध सुपरस्टारसाठी नाही. हे पुढील मोठ्या कल्पनेसाठी आहे

डेव्हिड ली, एनबीए इन्व्हेस्टमेंटचे प्रमुख. (फोटो क्रेडिट: एनबीए रायझिंग स्टार्स इनव्हिटेशनल) सिंगापूरमधील TimesofIndia.com: सिंगापूरमधील OCBC एरिना येथे NBA Rising Stars Invitational 2026 च्या...

दोन दुर्मिळ तांबे प्लेट्स एलिफंटाचा सागरी भूतकाळ उघडतात

या वर्षी एलिफंटा येथे उत्खनन केलेल्या दोन मोठ्या स्टोरेज जारपैकी एका खोलवर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने 17 एप्रिल रोजी दुहेरी खजिना अडखळला.पश्चिम भारतातील...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिस म्हणतात की सिया गोयलने...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

स्वीडिश मंत्री तिच्या 3 महिन्यांच्या बाळाला EU बैठकीत घेऊन आले; व्हायरल व्हिडिओ देशातील उदार...

या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. गुरुवारी संपूर्ण युरोपमधील मंत्री हवामान धोरणांवर चर्चा करण्यासाठी लक्झेंबर्गमध्ये एकत्र आले तेव्हा एका क्षणाने पटकन स्पॉटलाइट...

error: Content is protected !!