Homeशहरबदलापूर (पूर्व) येथील वालिवली परिसरात उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक घनकचरा प्रकल्पाचा उल्हासनगर महापौर,...

बदलापूर (पूर्व) येथील वालिवली परिसरात उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक घनकचरा प्रकल्पाचा उल्हासनगर महापौर, उपमहापौर आमदार व नगरसेवकांचा पाहणी दौरा

उल्हासनगर दि २८ ( प्रमोद दळवी ) : सहा दिवसापूर्वी उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत शहरातील कॅम्प नंबर -५ परिसरातील डम्पिंग ग्राउंड संदर्भात भाजपच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले होते. याशिवाय या डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून त्या ठिकाणाहून ते डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करावे अशी मागणी केली होती. आता बदलापूर (पूर्व) येथील वालिवली परिसरात उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक घनकचरा प्रकल्पामुळे उल्हासनगर शहरातील कचरा समस्या सुटणार आहे. मंगळवारी उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी निकम, आमदार कुमार आयलानी, उपमहापौर अमर लोंढे व विविध पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी त्या प्रकल्पाचा पाहणी दौरा केला.

बदलापूर (पूर्व) येथील वालिवली परिसरात उभारण्यात येत असलेला १४८ कोटी रुपयांचा एकात्मिक घनकचरा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून, बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरांतील कचरा समस्या सुटणार आहे. सुमारे २३ एकर जागेत उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात दररोज ६०० हून अधिक मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार असून सुक्या कचऱ्यापासून इंधन निर्मिती केली जाणार आहे. तसेच प्लास्टिक, काच, कापड यांसारख्या वस्तूंची पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. बांधकामातील कचऱ्याचाही पुनर्वापर करण्याची व्यवस्था या प्रकल्पात करण्यात आली आहे. वालिवली परिसरातील सर्वेक्षण क्रमांक १८८ या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची क्षमता दररोज ६४१ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची असून त्यामुळे डम्पिंग ग्राउंडवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, एकूण कचऱ्यापैकी सुमारे ५५ टक्के कचऱ्याची विल्हेवाट लावली जाईल, तर ४५ टक्के ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाईल.

मंगळवारी या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी महापौर अश्विनी निकम, आमदार कुमार आयलानी, उपमहापौर अमर लुंड, भाजप गटनेते राजेश वधारिया, स्थायी समिती सभापती कलवंत सिंह सोहता, विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे, आरोग्य सभापती सविता ताई तोरणे-रगडे, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक प्रधान पाटील , इतर नगरसेवक व मनपा अधिकारी तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला .

यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कचऱ्याच्या प्रक्रियेची पद्धत, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि उर्वरित कामाबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पातील मुख्य शेडचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून सध्या यंत्रसामग्री बसवण्याचे काम मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. हा क्लस्टर प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर तीनही शहरांना कचरामुक्त करण्यासोबतच दुर्गंधीच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मदतीने राबविण्यात येत असून, यामुळे परिसरातील प्रदूषणावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे उल्हासनगर शहरातील कचरा समस्या आता सुटणार आहे. त्यामुळे शहरातील कॅम्प नंबर -५ परिसरातील डम्पिंग ग्राउंड परिसरातील नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मंत्रालयाच्या टाकीत एकही मांजर बुडाले नाही, असे पीडब्ल्यूडीचे म्हणणे आहे

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मांजर पडून मरण पावल्याची सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी फेटाळून लावल्या. "गेल्या काही...

पुण्यात मंगळवारी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला

पुणे: सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळी रुळावरून घसरल्याने मंगळवारी पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आणि पुणे-मुंबई दरम्यानच्या शहरांतर्गत...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीने तरुण चाहत्यांसाठी नम्र हावभाव करून मन जिंकले – पहा |...

तरुण चाहत्यांसाठी वैभव सूर्यवंशी यांचे हृदयस्पर्शी हावभाव (स्क्रीनग्रॅब/एक्स) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शानदार शतकाच्या जोरावर वैभव सूर्यवंशी मुल्लानपूर येथील त्यांच्या घरच्या मैदानावर फॉर्मात असलेल्या पंजाब...

मानसशास्त्रानुसार, 10 शक्तिशाली चिन्हे तुम्ही अत्यंत भावनिकदृष्ट्या प्रौढ आहात

आम्ही सर्वजण 40 वर्षांचे असले तरी 20 वर्षांचे असलेल्या व्यवहाराला आणि 20 च्या वयात असलेल्या व्यक्तीनुसार त्यांच्या वयानुसार प्रौढ असलेल्या व्यक्तीला भेटले आहे. कारण...

उल्हासनगरातील मध्यवर्ती हॉस्पिटलमधील विविध समस्यांवर डॉक्टर आणि आमदार कुमार आयलानी यांची महत्त्वाची बैठक...

उल्हासनगर दि.२८ ( प्रमोद दळवी ) : मध्यवर्ती हॉस्पिटलमधील विविध समस्या आणि त्यांच्या तात्काळ निराकरणासाठी आमदार कुमार आयलानी यांनी त्यांच्या  जनसंपर्क कार्यालयात एक महत्त्वाची...

error: Content is protected !!