Homeशहरबदलापूरात 'लाडक्या खड्ड्याचा' तिसरा वाढदिवस साजरा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन

बदलापूरात ‘लाडक्या खड्ड्याचा’ तिसरा वाढदिवस साजरा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन

बदलापूर दि.३० ( प्रमोद दळवी )  : बदलापूर शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. शहरातील एका मोठ्या खड्ड्याचा ‘लाडका खड्डा’ म्हणून तिसरा वाढदिवस केक कापून आणि फटाके वाजवून साजरा करत नगरपालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

शहरातील रस्त्यांवर वारंवार त्याच ठिकाणी खड्डे पडत असून, त्याबाबत अनेक वेळा आंदोलने, निवेदने आणि पत्रव्यवहार करूनही नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विशेषतः पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न केल्यामुळे पूर्व आणि पश्चिम बदलापूरमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी खड्ड्याला केक भरवून त्याचा प्रतीकात्मक वाढदिवस साजरा केला. त्यानंतर उर्वरित केक उपस्थित कार्यकर्ते तसेच शाळेच्या बस चालक, रिक्षा चालक, ऑटोचालक, दुचाकीस्वार आणि नागरिकांना भरवून खड्ड्यांच्या समस्येविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन करत नगरपालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. येत्या चार ते पाच दिवसांत शहरातील खड्डे तातडीने बुजवले नाहीत, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या पुढाकाराने हे आंदोलन आयोजित करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख किशोर पाटील, ज्येष्ठ समाजसेवक नाना देशमुख, नागेश बरे, हेमंत पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा पर्यावरण प्रमुख प्रदीप रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव राजेश वानखडे, महिला उपाध्यक्ष मनीषा पोळ, मनोज शुक्ला, सिद्धार्थ खरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे अपघातांचा वाढता धोका लक्षात घेता नगरपालिका प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माता आणि आजी-आजोबांचे मतदार तपशील मॅपिंगसाठी वैध: राज्य मतदान कार्यालय | पुणे बातम्या

SIR साठी कोंढव्यात BLO कॅम्प पुणे : राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या उच्च प्रतिनिधींनी म्हटले आहे की 2002 च्या SIR मधील माता आणि आजी-आजोबा...

दिल्लीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची राजेंद्र चौधरी यांची सदिच्छा भेट; उल्हासनगरातील पहिली...

उल्हासनगर दि . ३० ( प्रमोद दळवी )  : शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नवी दिल्ली येथील...

उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांची मनपा शाळा क्र. २४ ला भेट; ‘घे भरारी’...

उल्हासनगर दि. ३० ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी  गुरवारी दि. ३० जुलै रोजी महानगरपालिकेच्या 'घे भरारी'...

समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे अभिनेते महेश्वर तेटांबे यांना ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित

मुंबई दि.३० ( प्रमोद दळवी )  : आपल्या प्रभावी अभिनयातून, सामाजिक आशयपूर्ण लेखणीतून आणि निरपेक्ष समाजसेवेतून समाजप्रबोधनाचा वारसा जपणारे प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, लेखक व...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

error: Content is protected !!