उल्हासनगर दि.१ : महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ह्यांच्या वाढदिवस उल्हासनगर काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नागरिकान सोबत साजरा करण्यात आला.

उल्हासनगर ४ येथील महिला कांग्रेस अध्यक्ष सौ मनीषा महाकाळे ह्यांच्या अतिशय सेवा भावाने चालवीत असलेल्याआस्था बहुउद्देशीय संस्था अंतर्गत विश्रांती वृधाश्रम येथे उल्हासनगर काँग्रेसच्या वतीने एक महिन्याचे राशन सामग्री दान करण्यात आले. ह्या नंतर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच सर्वांना गणेशोत्सव निमित्त नाश्ता व उकड़िचे मोदक वाटप करण्यात आले. ह्या वेळेस वृधाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सपकाळ साहेबांना दीर्गायुष्य च्या शुभेच्छा देत उल्हासनगर कांग्रेस सोबत आनंदाचे काही क्षण साजरा केला.
ह्या वेळेस जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे , माजी नगरसेविका अंजली साळवे , साउथ ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके ,महिला अध्यक्ष मनीषा महाकाळे,उपाध्यक्ष राजू फक्के, बापू पगारे , कालिंदी गवई , विजया मोर आदि पदाधिकारी उपस्थित होते





























