Homeशहरठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सहकार पॅनलचा झेंडा

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची सरशी
  • शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून सहकार पॅनलचे अभिनंदन
  • दोन्ही जिल्ह्यातील महिला, शेतकरी, बचत गट, स्वयंसहायत्ता गटांसाठी बँक काम करेल

ठाणे दि.३० : ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवल्याबद्दल शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अभिनंदन केले. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीने सहकार पॅनलची निवडणुकीत सरशी झाली. सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेले संचालक ठाणे आणि पालघर जिल्ह्यात महिला, शेतकरी, बचत गट, स्वयंसहायत्ता गटांसाठी काम करतील, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहकार पॅनलचे विजयी उमेदवार तसेच बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर, माजी आमदार राजेश पाटील उपस्थित होते.

सहकार पॅनलला शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी पाठिंबा दिला होता. निवडणुकीत सहकार पॅनलच्या उमेदवारांवर बँकेच्या सभासदांनी विश्वास दाखवला त्याबद्दल खासदार डॉ. शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले. राज्यात सहकार वाढला पाहिजे, सहकारातून समृद्धी साधण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार पॅनलला मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री शिंदे निवडणुकीतील विजयी रणनीतीवर काम केले. ठाणे जिल्ह्यातल्या जागांसाठी त्यामुळे बहुतांश जागा बिनविरोध झाल्या होत्या.वसई तालुक्यात सहकार पॅनलसाठी एकहाती मतदान झाले, त्याबद्दल खासदार डॉ. शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितीज ठाकूर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

खासदारांना शिव्या देण्यापेक्षा आत्मपरिक्षण करा

शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांच्या मतदार संघात जाऊन शिव्या देण्यापेक्षा नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून का जातात, याचे आत्मपरिक्षण करा, अशी टीका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उबाठावर केली. शिवसेना भगवा झेंडा उरावर घेऊनच पुढे चालली आहे म्हणून राज्यातील मतदारांनी २०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेला भरभरुन मतदान केले आणि उबाठाला जागा दाखवली, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. त्यांना आता सकाळपासून रात्रीपर्यंत शिव्या देण्याचे काम उरले आहे, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी लगावला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हार्दिक पांड्या मुंबईहून बेंगळुरूला तळ हलवतो: हे कारण आहे

हार्दिक पांड्या (एएनआय फोटो) भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या करिअरच्या महत्त्वाच्या वाटचालीत बेंगळुरू येथे स्थलांतरित झाला आहे, BCCI च्या सेंटर ऑफ एक्सलन्सला (COE)...

मुंबईतील चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड पडल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू, 4 जखमी

13 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या मेक फोर्स स्कूल बसवर (MH03/CV-7439) झाड कोसळल्याची घटना दुपारी 3 च्या सुमारास रोड क्रमांक 11 वरील हेरिटेज प्राईडजवळ घडली....

त्याच्या बाजूला व्यावहारिक KU सह, मुकुंदचे डोळे आनंदी पुनरुत्थान

पुणे: अनौपचारिक क्रीडा चाहत्यांसाठी, त्यांची भागीदारी एक आकर्षक प्रयोग आहे: दोन माजी प्रतिस्पर्धी आणि जवळचे मित्र व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यापासून प्रशिक्षक आणि विद्यार्थी या...

मेगापोडे: मेगापोडेला भेटा: पिल्लेसारखा पक्षी जो आपली अंडी हेतुपुरस्सर पुरतो आणि ती मुले पुन्हा...

पारंपारिक उष्मायनाला मागे टाकणारा कोंबडीच्या आकाराचा पक्षी मेगापोड सह निसर्गाची कल्पकता चमकते. नर वनस्पतीपासून उष्णता निर्माण करणारे ढिगारे काळजीपूर्वक तयार करतात, अंडी उबविण्यासाठी...

पहिल्याच पावसात उल्हासनगरातील शिवाजी चौक पाण्याखाली: व्यापाऱ्यांसह वाहन चालक त्रस्त

उल्हासनगर दि. ३० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या विकासकामांसाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करूनही उल्हासनगर शहराची परिस्थिती जैसी थी वैशीच दिसून येत असल्याचे...

error: Content is protected !!