Homeशहरठाणे-पालघर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहाने संपन्न..

ठाणे-पालघर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहाने संपन्न..

ठाणे दि.२१: ठाणे-पालघर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा ठाणे येथील सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात संघटनेचे समन्वयक प्रा.शिवाजी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र भदाणे यांच्या उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

ठाणे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुरेश अहिरे यांनी प्रास्तविक करून उपस्थितांचे स्वागत केले.ठाणे जिल्हा सचिव प्रा.केशव चौधरी यांनी गेल्या सभेचे इतिवृत्त सादर केले.प्रा.शिवाजी जगताप यांनी वार्षिक जमाखर्चाचे वाचन करून अध्यक्षीय मनोगत अतिशय प्रभावीपणे व्यक्त केले. ठाणे जिल्हा सल्लागार प्रा.दत्तात्रय चितळे,ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश माळी तसेच पालघर जिल्हा सचिव प्रा.विलास खोपकर यांनीही सभेला संबोधित केले.महासंघाचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान पालघर जिल्हा अध्यक्ष प्रा.सुनिल पूर्णपात्रे यांनी सभासद जोडो अभियान विषयी अतिशय उपयुक्त माहिती सभेला दिली.प्रा.राजेंद्र भदाणे यांनी शिक्षकांच्या अडचणी संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले.यानंतर उपस्थित शिक्षक बंधू-भगिनींनी चर्चेच्या माध्यमातून आपल्या समस्या अतिशय चांगल्या प्रकारे प्रस्तुत केल्या.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला व शिक्षकांचे मनोबल वाढविले.ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्रा.कांतीलाल चव्हाण यांनी आभार प्रदर्शनातून उपस्थितांचे ऋण व्यक्त केले.प्रा.सुरेश अहिरे यांनी या सभेचे सूत्रसंचालन अतिशय खुमासदारपणे केले.सदर सभेसाठी ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक बंधू-भगिनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इना गार्टेनचे घर हे बेल्जियन-शैलीचे धान्याचे कोठार आहे जे तिच्या व्यक्तिमत्त्वाशी बोलते: सजावटीची प्रेरणा...

इना गार्टेनचे ईस्ट हॅम्प्टनचे घर, मोहक, अव्यवस्थित राहणीमानातील एक मास्टरक्लास, एक स्वागतार्ह जागा तयार करण्यासाठी ब्लू प्रिंट ऑफर करते. तिचे डिझाइन तत्त्वज्ञान तटस्थ,...

केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा ‘सिंगापूर’मध्ये पार्टी करतानाचा आणखी एक व्हिडिओ ऑनलाइन समोर...

पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा आणखी एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती सिंगापूरमध्ये एका खाजगी पार्टीत...

‘वय को छोडिये’: मूळ भारतीय आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जय मुंद्राने वैभव सूर्यवंशीला प्रवेश दिला...

जय मुंद्रा यांनी वैभव सूर्यवंशीला प्रवेश दिला भारतीय वंशाचा आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जय मुंद्रा किशोरवयीन फलंदाजी खळबळजनक वैभव सूर्यवंशीच्या चाहत्यांच्या वाढत्या यादीत सामील...

एक शाळा कशी शांतपणे सर्वसमावेशक थिएटरसाठी रंगमंचाला आकार देत आहे

मुंबई: बुधवारी दुपारी, गोवंडीतील एका ड्रामा स्टुडिओमध्ये 20 तरुण एका परफॉर्मन्सवर काम करत आहेत, जे शहराने पाहिले नाही. शब्द हळू आणि मुद्दाम...

‘कोठडीतील कबुलीजबाब पुरावा म्हणून मान्य नाही’: केतन अग्रवाल खून प्रकरणात सिया गोयलचे वकील

पुणे : केतन अग्रवाल खून खटल्यातील आरोपी सिया गोयलच्या वकिलांनी रविवारी असा युक्तिवाद केला की, पोलिस कोठडीत असताना दिलेली कोणतीही कबुली पुरावा...

error: Content is protected !!