Homeशहरखासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे पुन्हा करणार आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व

खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे पुन्हा करणार आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ‘पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप’मध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती

इंडोनेशिया येथे जाणाऱ्या शिष्टमंडळाचे करणार नेतृत्व

कल्याण दि .२४ :- ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळामधील सक्रिय आणि यशस्वी सहभागानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची एक महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ‘पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप’मध्ये डॉ. शिंदे यांचीही निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले असून यातील इंडोनेशिया देशाचा दौरा करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व हे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे करणार आहेत.

ऑपरेशन सिंदूरअंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येत भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगासमोर मांडत होते. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. यावेळी त्यांनी यूएई, सिएरा लिनोन, लायबेरिया, डीआर काँगो या देशांमध्ये भेट दिली होती. आणि ऑपरेशन सिंदुरबाबत भारताची भूमिका या सर्व देशांमध्ये ठामपणे मांडली होती.  त्याच धर्तीवर आता पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्सच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारताची संसदीय कूटनीती अधिक मजबूत करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न केला जात आहे. भारताचे विविध देशांशी संसदीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत विविध पक्षांतील खासदारांचा समावेश असलेली शिष्टमंडळे ६० हुन अधिक देशांचा दौरा करणार आहे.

या दौऱ्यादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि द्विपक्षीय सहकार्य या विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. यामध्ये रविशंकर प्रसाद, पी. चिदंबरम, राम गोपाल यादव, टी.आर. बालू, सुप्रिया सुळे, शशी थरूर, अनुराग ठाकूर, असदुद्दीन ओवैसी, अखिलेश यादव, डेरेक ओ’ब्रायन, मनीष तिवारी, अभिषेक बॅनर्जी, कणिमोळी, गौरव गोगोई यांसारख्या दिग्गज नेत्यांपासून ते डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सारख्या युवा खासदारांपर्यंत व्यापक प्रतिनिधित्व या गटांमध्ये दिसून येत आहे.

यामध्ये इंडोनेशिया, श्रीलंका, जर्मनी, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, भूतान, सौदी अरेबिया, इस्रायल, मालदीव, अमेरिका, रशिया, युरोपियन संसद सदस्य देश, दक्षिण कोरिया, नेपाळ, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जपान, इटली, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, सिंगापूर, ब्राझील, व्हिएतनाम, मेक्सिको, इराण आणि यूएई अशा विविध महत्त्वाच्या देशांसोबत संवाद साधला जाणार आहे.

युवा आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत केंद्रीय पातळीवरून त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे भारताचा आवाज जागतिक पातळीवर अधिक प्रभावीपणे पोहोचणार असल्याचे मानले जात आहे. तसेच खासदार डॉ. शिंदे यांच्या या नव्या आंतरराष्ट्रीय भूमिकेमुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला नवे बळ मिळणार असून ते जागतिक पातळीवर आपला आणखी एक ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

या उपक्रमाविषयी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले की, या माध्यमातून भारतीय खासदारांना विविध देशांतील संसद सदस्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. उत्कृष्ट संसदीय कार्यपद्धतींची देवाणघेवाण, संसद ते संसद आणि जनता ते जनता या स्तरावर संवाद वाढवणे, तसेच पारंपरिक राजनैतिक प्रयत्नांसोबत संसदीय कूटनीतीला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. एकूणच, या पुढाकारामुळे भारताची जागतिक उपस्थिती अधिक बळकट करण्यास आणि संसदीय कूटनीतीला नवे बळ देण्यास महत्त्वपूर्ण चालना मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जनता वसाहत येथे वटवृक्ष अंगावर पडल्याने दोन महिला जखमी | पुणे बातम्या

एका मोठ्या वटवृक्षावर पडलेल्या दोन जखमी महिलांना आपत्कालीन प्रतिसादकर्ते मदत करतात, अचानक झाड पडण्याची दुर्घटना आणि सार्वजनिक सुरक्षेच्या समस्यांवर प्रकाश टाकतात (प्रतिनिधी प्रतिमा)...

‘मी कोणताही फॉरमॅट सोडून देईन’: T20 च्या धूमधडाक्यात, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूला ‘10,000 कसोटी धावा’...

ल्हुआन-ड्रे प्रिटोरियसने प्रोटीस विरुद्ध झिम्बाब्वेसाठी विक्रमी शतक ठोकले (ईटी द्वारे प्रतिमा) दक्षिण आफ्रिकेच्या किशोरवयीन सनसनाटी लुआन-ड्रे प्रिटोरियसने आपले प्राधान्यक्रम स्पष्ट केले आहेत. जगभरातील...

बीएमसीने घाटकोपर एसटीपीसाठी मार्च 2027 ची अंतिम मुदत निश्चित केली, अधिकाऱ्यांना गती वाढवण्यास सांगितले

प्रकल्पाचा चार वर्षांचा बांधकाम कालावधी असून त्यानंतर 15 वर्षे ऑपरेशन आणि देखभालीचा कालावधी आहे. मुंबई: घाटकोपर येथील 337 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी)...

मोशी दुर्घटनेसाठी PCMC मुसळधार पाऊस आणि मिथेन तयार झाल्याचा आरोप | पुणे बातम्या

अधिका-यांनी सांगितले की इमारत लँडफिलपासून सुमारे 30 मीटर अंतरावर होती आणि कचऱ्याचा ढिगारा काही सेकंदात मार्गस्थ झाला, ज्यामुळे रहिवाशांना प्रतिक्रिया देण्यासाठी थोडा वेळ...

2026 मधील भारतातील सर्वात श्रीमंत जिल्हे: प्रत्येक प्रवाशाने एक्सप्लोर केलेली 10 श्रीमंत ठिकाणे |

जेव्हा जागतिक प्रवासी भारताचा विचार करतात तेव्हा ते अनेकदा प्राचीन मंदिरे, जुने राजवाडे आणि किल्ले, पर्वत आणि समुद्रकिनारे यांची कल्पना करतात. तथापि,...

error: Content is protected !!