Homeशहरखर्डी येथे २० मिनिटे लोकल खोळंबली; राजधानी एक्सप्रेसला प्राधान्य, प्रवाशांचा संताप...

खर्डी येथे २० मिनिटे लोकल खोळंबली; राजधानी एक्सप्रेसला प्राधान्य, प्रवाशांचा संताप रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार; कसारा मार्गावरील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

कल्याण, दि.१९ ( प्रमोद दळवी )  : मध्य रेल्वेच्या कल्याण–कसारा मार्गावरील प्रवाशांशी रेल्वे प्रशासनाकडून वारंवार दुजाभाव केला जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. खर्डी स्थानकात कसारा लोकल तब्बल २०  मिनिटांहून अधिक काळ थांबवून राजधानी एक्सप्रेसला मार्ग मोकळा करून देण्यात आल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती .

कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (१९  जुलै) ते शहाड ते उंबरमाळी असा कसारा लोकलने प्रवास करत होते. ही लोकल शहाड स्थानकावर सायंकाळी ४ .१८  वाजता येते. गाडी काही मिनिटे उशिराने आली असली तरी पुढे खर्डी स्थानकात कोणतेही स्पष्ट कारण न देता लोकल दीर्घकाळ उभी ठेवण्यात आली. याबाबत स्थानक व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, “पुढे राजधानी एक्सप्रेस गेल्यानंतरच लोकल सोडण्यात येईल,” असे उत्तर देण्यात आल्याचा दावा घनघाव यांनी केला. यानंतर त्यांनी तात्काळ मध्य रेल्वेच्या चीफ कंट्रोलर कार्यालयाशी (022-67455618) संपर्क साधून याबाबत जाब विचारला. मात्र ड्युटीवरील अधिकाऱ्याने “आगे राजधानी एक्सप्रेस जाएगी” एवढेच उत्तर वारंवार दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मराठी आणि हिंदी भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही अधिकाऱ्याने समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.

“आम्ही काही गुरेढोरे आहोत का? आम्ही फुकट प्रवास करतो का?” असा संतप्त सवाल केल्यानंतरही अधिकाऱ्याने तेच उत्तर दिल्याचे घनघाव यांनी नमूद केले. अखेर खर्डी स्थानकात लोकल 20 मिनिटांपेक्षा अधिक काळ खोळंबून राहिली. या घटनेमुळे लोकलमधील गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच इतर शेकडो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांना नियोजित वेळेपेक्षा उशिरा घरी पोहोचावे लागल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

राजेश घनघाव यांनी रेल्वे प्रशासनावर उपनगरीय प्रवाशांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, मेल व एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी लोकल गाड्या विनाकारण अडविण्याची पद्धत तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. “उपनगरीय प्रवाशांच्या वेळेचे आणि सुरक्षेचे महत्त्व रेल्वे प्रशासनाने ओळखले पाहिजे. यापुढेही अशाच प्रकारे लोकल गाड्या अडवून मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिल्यास प्रवाशांच्या वतीने ‘रेल रोको’ आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.कसारा मार्गावरील प्रवाशांशी होणारा कथित भेदभाव तातडीने थांबवून लोकल सेवेला योग्य प्राधान्य द्यावे, अशी मागणी कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र रिटेंडर्सची मागणी काँग्रेसने केली, या निर्णयामुळे ५६७ कोटी रुपयांची...

पीएमसीमधील काँग्रेस नेते रामचंद्र कदम यांनी आरोप केला की देशभरात केवळ चार कंत्राटदार मिश्र कचऱ्याची प्रक्रिया हाताळतात आणि आपापसात करार विभाजित करण्यासाठी कार्टेल...

‘आता तुम्ही संजू सॅमसन आणि वैभव सूर्यवंशीप्रमाणेच केएल राहुललाही खराब करत आहात’: भारताच्या माजी...

केएल राहुल (इमेज क्रेडिट: बीसीसीआय) नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार क्रिस श्रीकांतने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेदरम्यान केएल राहुलला सहाव्या क्रमांकावर पाठवल्याबद्दल भारतीय...

बेस्ट अपघातात ठार झालेले 65 वर्षीय शेतकरी आपल्या मुलीला भेटण्यासाठी आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी...

मुंबई : मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर सोमवारी बेस्टची बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर आदळल्याने दहा जण गंभीर जखमी झाले असून एकाचा मृत्यू...

आंतरराष्ट्रीय अभ्यास कोविड उघड झाल्यानंतर पुरवठा साखळीतील अंतर स्थानिक उपाय देते | पुणे बातम्या

पुणे : कोविड साथीच्या रोगाने जग कसे असुरक्षित आहे हे दाखवून दिल्यानंतर महाद्वीपांमध्ये पसरलेल्या प्रयोगशाळा स्थानिक पातळीवर निदान आणि संशोधनासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे जैविक...

एलोन मस्कचे कोट: इलॉन मस्कचे दिवसाचे कोट: “तुम्ही चुकीचे आहात असा दृष्टीकोन घ्यावा. तुमचे...

आत्मविश्वासासह यशाची जोड पुरेशी वैशिष्ट्यपूर्ण आहे. इलॉन मस्कचे प्रसिद्ध कोटेशन अगदी विरुद्ध आहे: "तुम्ही चुकीचे आहात असा दृष्टीकोन घ्यावा. तुमचे ध्येय कमी...

error: Content is protected !!