Homeशहरउल्हासनगर महापालिकेच्या महासभेत पाच पूरक विषयांचा समावेश; मॅन्युअल निविदा, पीएम आवास, विकास...

उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत पाच पूरक विषयांचा समावेश; मॅन्युअल निविदा, पीएम आवास, विकास आराखडा व क्लस्टर डेव्हलपमेंटवर चर्चा होणार

उल्हासनगर दि. १७  ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी होणाऱ्या महासभेच्या कामकाजात पाच महत्त्वाच्या पूरक प्रस्तावांचा समावेश करण्यात आला आहे. महापालिका सचिव अनंत जावद्वार यांनी जारी केलेल्या पूरक सूचनेनुसार, महानगरपालिका, स्थायी समिती, परिवहन समिती आदींच्या कामकाज विषयक नियम १ (जे) अन्वये हे अतिरिक्त विषय महासभेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात येणार आहेत.

महासभेच्या विषय क्रमांक १७ अंतर्गत उल्हासनगर महापालिकेने मॅन्युअल पद्धतीने काढलेल्या निविदांमध्ये कथित गैरव्यवहार व अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव पालिका सदस्य संजय सिंह आणि राजेश वानखेडे यांनी मांडला असून तो महासभेच्या विचारार्थ ठेवण्यात येणार आहे.

विषय क्रमांक १८ मध्ये संतोष नगर आणि महादेव नगर परिसरातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत प्रस्तावित प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना पूर्वसूचना किंवा पुरेशी माहिती न देता नोटिसा बजावण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. तसेच बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रस्ताव पालिका सदस्य अरुण आशान, इंदिरा पाटील आणि संगीता सपकाळे यांनी मांडला आहे.

विषय क्रमांक १९ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काढण्यात आलेल्या सर्व मॅन्युअल निविदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रस्ताव पालिका सदस्या दिप्ती दुधानी यांनी महासभेसमोर मांडला आहे.

विषय क्रमांक २० अंतर्गत महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (एमआरटीपी कायदा) च्या कलम ३८ नुसार उल्हासनगर शहराच्या सुधारित मंजूर विकास आराखड्यातील गंभीर त्रुटी, हरकती आणि आवश्यक सुधारणांचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीनंतर अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्याचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव पालिका सदस्य दुर्गाप्रसाद राय आणि राजेश वधरिया यांनी मांडला आहे.

दरम्यान, विषय क्रमांक २१ मध्ये मंजूर विकास आराखड्यानुसार क्लस्टर डेव्हलपमेंट प्रभावीपणे राबविण्यासाठी शहराची भौगोलिक रचना आणि क्षेत्रफळ लक्षात घेऊन व्हर्टिकल डेव्हलपमेंटचा प्रस्ताव तयार करण्यासाठी विशेष समिती गठित करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित समितीचा अहवाल आणि प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्याबाबतही महासभेत चर्चा होणार आहे. हा प्रस्तावही पालिका सदस्य राजेश वधरिया आणि दुर्गाप्रसाद राय यांनी सादर केला आहे.

या पाचही पूरक प्रस्तावांमुळे आगामी महासभा महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता असून, महापालिकेच्या निविदा प्रक्रिया, प्रधानमंत्री आवास योजना, शहराचा विकास आराखडा आणि भविष्यातील क्लस्टर डेव्हलपमेंट धोरण यांसारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘खेळाचे खरे प्रतीक’: बीसीसीआयने थ्रोबॅक व्हिडिओसह सर गारफिल्ड सोबर्स यांना श्रद्धांजली वाहिली | क्रिकेट...

वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू गारफिल्ड सोबर्स आणि त्याच्या पत्नीसोबत विराट कोहली. (पीटीआय फोटो) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर गारफिल्ड सोबर्स यांना श्रध्दांजली...

BMC 22 जुलै रोजी मुंबईत 227 वॉर्डांमध्ये मोफत स्तन कर्करोग तपासणी मोहीम आयोजित करणार...

मुंबई: BMC 22 जुलै रोजी सर्व 227 महापालिका प्रभागांमध्ये मोफत स्तनाचा कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करेल, ज्यात शहरव्यापी लवकर शोध मोहिमेचा भाग...

डेब्रिज डंपिंग रोखण्यासाठी पीएमसी नदीपात्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार | पुणे बातम्या

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील स्थानिक पूर आणि पायाभूत सुविधांमध्ये व्यत्यय निर्माण झाला पुणे : पुणे महानगरपालिकेने (PMC) वारंवार तक्रारी आल्यानंतर मुळा आणि...

NRI ने 5 गोष्टी उघड केल्या आहेत ज्या तिला भारतात काम करण्याबद्दल कोणीही इशारा...

सोशल मीडिया अनेकदा दैनंदिन अनुभवांना मोठ्या संभाषणांमध्ये रूपांतरित करतो आणि यावेळी, भारतीय कार्यालयांमधील जीवनावर प्रकाश टाकला जातो. भारतात परतल्यानंतर कामाच्या संस्कृतीशी जुळवून...

ठाणे जिल्ह्यात स्मार्ट शाळा, ग्रामीण भागात एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला गती

- दिशा समितीच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निर्देश ठाणे दि. १७ : - ठाणे जिल्ह्यातील शासकीय शाळांचे आधुनिकीकरण, ग्रामीण व शहरी भागातील घनकचरा...

error: Content is protected !!