उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ) : भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महापालिका आयुक्त श्रीमती मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलाचे जवान तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी ८.१५ वाजता स्थायी समिती सभापती कलवंत सिंग सोहता यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’, आणि राज्यगीत सादर करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह साजरा केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी महापौर श्रीमती अश्विनी कमलेश निकम यांच्या हस्ते हॅन्ड मशीनचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करून त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने विविध प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन कौशल्य प्राप्त करणाऱ्या आणि रोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षणार्थी महिलांचा यावेळी उत्साहाने गौरव करण्यात आला. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारे पर्यावरणप्रेमी राजू तेलकर यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

या स्वातंत्र्य दिन सोहळ्यास महापौर श्रीमती अश्विनी कमलेश निकम, महापालिका आयुक्त श्रीमती मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.), उपमहापौर अमर लुंड, स्थायी समिती सभापती कलवंत सिंग सोहता, सभागृह नेते अरुण आशान, विरोधी पक्षनेत्या श्रीमती अंजली साळवे, सार्वजनिक बांधकाम सभापती श्रीमती दिप्ती दुधानी, गलिच्छ वस्ती व निर्मलन सभापती विपुल दत्ताराम मयेकर, क्रीडा, समाजकल्याण व सांस्कृतिक सभापती श्रीमती प्रिती विनोद माखिजा, प्रभाग समिती क्रमांक २च्या सभापती श्रीमती हजारे संघमित्रा विशाल आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक जमुनादास पुरस्वानी, नानाबागुल, महेश सुखरामानी, विकास खरात, नगरसेविका श्रीमती शोभाताई जाधव, श्रीमती इंदिरा निखिल पाटील, श्रीमती कांचन अमर लुंड यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण, उपआयुक्त (मुख्यालय) डॉ. दिपाली चौगले, उपायुक्त (जनसंपर्क) श्रीमती स्नेहा करपे, मुख्य लेखा अधिकारी श्रीमती नितल लव्हाळे, मुख्य लेखा परीक्षक श्रीमती सुषमा पाटील, सहायक आयुक्त अजय साबळे, जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी सत्यम गुप्ता, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, श्रीमती सलोनी निवकर, सार्वजनिक आरोग्य सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे, सिस्टिम अनालिस्ट श्रीमती श्रद्धा बाविस्कर, विधी विभाग अधिकारी राजा बुलानी, वाहन विभाग प्रमुख विनोद केणे, क्रीडा विभाग प्रमुख अजित गोवारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार आदी अधिकारी उपस्थित होते.

गोल मैदान येथे ११० फूट उंच राष्ट्रध्वजाला मानवंदना
मुख्यालयातील कार्यक्रमानंतर सकाळी १० वाजता गोल मैदान येथे उभारण्यात आलेल्या ११० फूट उंच राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास प्रभाग समिती क्रमांक १च्या सभापती श्रीमती ओवळेकर भावना केशव, प्रशासन अधिकारी किशोर गोसावी, सहाय्यक आयुक्त अजय साबळे, जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी, विधी विभाग अधिकारी राजा बुलानी यांच्यासह महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महापालिका मुख्यालय तसेच गोल मैदान या दोन्ही ठिकाणी महापालिकेच्या सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून परेड सादर करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमास महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे महापालिका मुख्यालयाचा परिसर अक्षरशः गजबजून गेला होता. राष्ट्रध्वजाला मानवंदना, देशभक्तीपर वातावरण, स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि महिला प्रशिक्षणार्थींचा गौरव यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन सोहळा विशेष ठरला.या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती उल्हासनगर महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.





























