उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी ) : प्रजा कृपा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचे मा. सचिव प्रकाश कुकरेजा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी प्रकाश कुकरेजा यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करत, समाजहितासाठी त्यांचे योगदान यापुढेही असेच सुरू राहावे अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली. वाढदिवसानिमित्त श्री. प्रकाश कुकरेजा यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी लाभो आणि आपल्या सामाजिक व सार्वजनिक जीवनातील कार्याला यशाची नवी उंची प्राप्त होवो, अशा शब्दांत राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांनी प्रकाश कुकरेजा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.





























