उल्हासनगर दि.५ ( प्रमोद दळवी ): इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शन व सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ या सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम के. एम. अग्रवाल कॉलेज ऑडिटोरियम, गोदरेज हिल खडकपाडा, पडघा रोड कल्याण (प.) या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात १३८ समाजसेवकांचा आकर्षक ट्रॉफी आणि सुरेख सन्मान पत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात उल्हासनगर मधील श्री देवानंद (प्रकाश) शिरसाट यांना महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमांस इंडियन आर्मीचे सुभेदार कॅप्टन महेंद्र गवई सर, एडिशनल कमिशनर जी एस टी पुणे साळुंखे सर, हिंदू रक्षक संदीप शर्मा सर, शकुंतला तायडे मॅडम, उद्योजिका सुमित्रा पाटील मॅडम, अभिनेत्री साक्षी नाईक, विजय वाघेला सर,का जल सुर्वे मॅडम, समाजसेविका मेहरुजीम खान मॅडम असे दिग्गज पाहुणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले, सदर कार्यक्रम पार पाडण्यास शितल पाटील, माणिक पाटील, तुकाराम पाटील, रवी वासवानी, राजकुमारी गुप्ता, शारदा पाटील, उर्मिला कदम, सुरेश कदम ,दिपाली पाटील ,केतन साळगावकर, गोरखनाथ कदम, पिंकी सौदा, सोनाली सोनवणे, स्नेहा थोरात,स्नेहल ओवाल, महेश गुप्ता, रेश्मा कदम, मुकेश गुप्ता, दीपक गुप्ता, केतन म्हात्रे ,सुशीला हांडे, चैताली पाटील,अनिरुद्ध जैस्वार व इतर सहकारी यांनी अथक परिश्रम घेतल. महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025चे आयोजक रामजीत( जितू) गुप्ता ( मुख्य तपासी अधिकारी अँन्टी पायरासी सेल मुंबई) व सौ शितल पाटील संस्थापक/ अध्यक्ष सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन ( रजि) अंबरनाथ हे होते. उल्हासनगरातील श्री देवानंद (प्रकाश) शिरसाट यांना महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने यांच्यावर उल्हासनगरातून सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या कार्यक्रमात मंगला देवानंद शिरसाट या देखील उपस्तीत होत्या.






























