Homeताज्या बातम्याउल्हासनगरातील अतिधोकादायक केसवानी कॉम्प्लेक्सच्या बी विंगवर महापालिकेने फिरवला बुलडोझर

उल्हासनगरातील अतिधोकादायक केसवानी कॉम्प्लेक्सच्या बी विंगवर महापालिकेने फिरवला बुलडोझर

उल्हासनगर दि १० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प  नंबर तीन परिसरात सपना गार्डन येथे असणाऱ्या केसवानी कॉम्प्लेक्सची बी विंग ही इमारत अतिधोकादायक असल्यामुळे पालिकेने बुधवारी या इमारतीवर बुलडोझर फिरवला. उल्हासनगरतील कॅम्प नंबर तीन येथे सपना गार्डन परिसरात केसवानी कॉम्प्लेक्स ही बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये ए विंग आणि बी विंग या दोन इमारती असून उल्हासनगर महापालिकेने २०२१ ला केसवानी कॉम्प्लेक्स ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती. पालिकेने या इमारतीला नोटीस देऊन ती इमारत पूर्णपणे खाली करण्यास सांगितले होते. याशिवाय त्या बिल्डिंगचा स्लॅब पडल्यामुळे ती इमारत अति धोकादायक स्थितीत झाली होती.

पालिकेने बिल्डिंग धारकांना ती बिल्डिंग रिपेअर करा किंवा ती पाडून टाका असे देखील सांगण्यात आले होते. ए विंगच्या इमारत धारकांनी त्यांची इमारत चेक करून पालिकेला रिपोर्ट दिला की बिल्डिंग स्टेबल आहे. पण बी विंगच्या धारकांनी गेल्या चार वर्षांपासून कोणतीच कारवाई केली नव्हती. याशिवाय पावसाळ्यात केसवानी कॉम्प्लेक्सच्या बी विंगची खूपच दुरवस्था झाली होती. पालिकेने इंजिनीयर पाठवून त्या बिल्डिंगची तपासणी केली असता इंजिनीयरने पालिकेला रिपोर्ट दिला की ही इमारत सी-१  कॅटेगिरी मध्ये येत आहे. त्यामुळे बी विंग इमारतीला डीमॉलिश करणे गरजेचे आहे असा अहवाल दिला. केसवानी कॉम्प्लेक्सची बी विंग इमारत ही मेन रोड व मार्केट एरिया मध्ये असल्यामुळे केव्हाही मोठी दुर्घटना घडण्याची  शक्यता निर्माण झाली होती. बुधवारी महानगरपालिकेचे वतीने केसवानी कॉम्प्लेक्सच्या बी विंग इमारतीवर बुलडोझर फिरण्यास सुरुवात केली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचा पुनर्विकास होणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मध्यवर्ती रुग्णालय नव्याने उभारणीसाठी जलदगतीने विकास आराखडा तयार करावा - खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे कामगार रुग्णालयाची क्षमता वाढवून सहा महिन्यात लोकार्पण होणार उल्हासनगर दि....

उल्हासनगर गारमेंट फेअर 3.0 च्या समारोपाला उद्योगमंत्री संजय सावकारे यांची भेट : आयोजकांच्या प्रयत्नांचे...

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगरच्या वस्त्रोद्योगाला नवी दिशा देणाऱ्या उल्हासनगर गारमेंट फेअर (UGF) 3.0 च्या समारोपाच्या दिवशी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री संजय...

स्वत:हून सूचनेनंतर एनजीटीने मोशी दुर्घटनेवर नागरी संस्था, प्रदूषण मंडळाकडून उत्तर मागवले

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित वेस्ट-टू-एनर्जी (डब्ल्यूटीई) प्लांटची तीन मजली प्रशासकीय इमारत मोशी येथील कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने घटनास्थळावरील ढिगारा हटवत आहे. पुणे : नॅशनल...

ज्ञानदा विद्या मंदिरात माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याने उजळल्या जुन्या आठवणी

उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) :- शाळेच्या प्रांगणात रंगलेला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा हा एक अत्यंत भावुक आणि आनंददायी सोहळा असतो.वर्षानुवर्षानंतर जुन्या...

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

error: Content is protected !!