Homeताज्या बातम्याअजितदादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार: दादांना निरोप देताना बारामतीकर गहिवरले

अजितदादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार: दादांना निरोप देताना बारामतीकर गहिवरले

  • सुरुवात बारामतीत अन् अखेरचा श्वासही बारामतीतच,
  • अजित पवार अमर रहेच्या घोषणा
  • मैदानात दादांच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश

बारामती  दि.२९ ( प्रमोद दळवी ) :  राज्याच्या राजकारणात अनेकदा धक्कातंत्राचा प्रत्यय देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांची अकाली एक्झिट अवघ्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली. वक्तशीर, बोलण्यात कडक पण तितकाच मिश्कील असलेला ‘दादा माणूस’ अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवार, २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले .

.“दादा परत या” हा आक्रोश केवळ शब्दांपुरता मर्यादित राहिला नव्हता, तर तो प्रत्येक बारामतीकराच्या श्वासात, प्रत्येक नजरेत उतरलेला होता. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात बारामतीतून झाली आणि शेवटचा श्वासही त्यांनी बारामतीत घेतला. ‘एकच वादा अजित दादा’, अशी घोषणा देत नागरिकांनी अजित पवारांना अखेरचा निरोप दिला. बारामतीत  शासकीय इतमामात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि पवार कुटुंबीयांनी अजित पवारांचे अखेरचे दर्शन यावेळी घेतले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार सरोज अहिरे, आमदार नमिता मुंदडा, राणा जगजितसिंह, झिशान सिद्दीकी, अनिल देशमुख, सुरज चव्हाण, अमोल मिटकरी, नरेश अरोरा, सचिन अहिर ,खासदार श्रीकांत शिंदे, संजय राठोड, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, मंगल प्रभात लोढा, आशिष जयस्वाल, श्रीरंग बारणे, खासदार बजरंग सोनावणे, संजय दीना पाटील, माणिकराव कोकाटे ,अभिनेता रितेश देशमुख, खासदार अमोल कोल्हे, राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सुरेश धस, विजय शिवतारे, दत्ता मामा भरणे ,राज्याच्या मंत्री अदिती तटकरे, मंत्री रविंद्र चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मंत्री जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील, हर्षवर्धन जाधव ,माजी खासदार प्रीतम मुंडे, राज्याचे मंत्री गिरीश महाजन, काँग्रेस नेते सुशीरकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश, राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण ,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, खासदार शाहू छत्रपती राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ यांच्याकडून अजित पवारांना शेवटची श्रद्धांजली देण्यात आली .

अजित पवारांच्या निधनामुळे आज महाराष्ट्रासह  बारामती निःशब्द झाली होती. पाणावलेले डोळे आणि सुन्न झालेले चेहरे अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी व्याकूळ झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येक क्षण अंतःकरण हेलावून टाकणारा होता. आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी कसलीही तमा न बाळगता बारामतीकडे धाव घेतली. कुणी दुचाकीवर, कुणी चारचाकीत, तर अनेक जण पायीच पोहचले. पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांतून हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी येथे दाखल झाले होते . परिसरात कुठेही गोंगाट नव्हता; मात्र त्या शांततेत दडलेला शोक अधिकच बोचरा वाटत होता. पत्नी सुनेत्रा पवार यांनी ३७ वर्षे अजितदादांबरोबर सहजीवनाचा प्रवास केला. तो आज अखेर संपला. अजितदादांना अखेरचा निरोप देताना दादा परत या..! हा आक्रोश शेवटच्या क्षणापर्यंत सुरु होता. यावेळी लाखोंच्या जनसमुदायाने अजित पवारांना अखेरचा निरोप दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

12 वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुंबई न्यायालयाने अल्पवयीन बलात्कार प्रकरणात पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

मुंबई: एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 12 वर्षे तुरुंगात घालवलेल्या 35 वर्षीय व्यक्तीची निर्दोष मुक्तता करताना एका विशेष पोक्सो न्यायालयाने डॉक्टरांच्या...

बागेश्वर धाम प्रमुखाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली; त्यांच्या या वक्तव्याचे...

पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नागपुरात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र...

IPL 2026: सर्वात तरुण. सर्वात वेगवान. न थांबता! वैभव सूर्यवंशी स्क्रिप्ट्स T20 इतिहास पुन्हा

आयपीएल 2026 मध्ये द वंडर किड वबिहाव सूर्यवंशी बिस्ट मोडमध्ये आहे " decoding="async" fetchpriority="high"/>द वंडर किड वबिहव सूर्यवंशी आयपीएल २०२६ मध्ये बीस्ट मोडमध्ये...

5 फॅब्रिक्स जे तुम्हाला उन्हाळ्यात थंड ठेवू शकतात

चला वास्तविक बनूया - कापूस हा प्रत्येकाचा उन्हाळा डीफॉल्ट आहे. आणि ते स्थान मिळवले आहे.हे मऊ, हलके आहे आणि हवा सहजतेने जाऊ देते, जे...

कथित पर्यावरण उल्लंघनाप्रकरणी पुणे रिव्हरफ्रंट प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश राज्याने दिले आहेत

पुणे: राज्याच्या पर्यावरण विभागाने पीएमसीच्या महत्त्वाकांक्षी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट (RFD) प्रकल्पाबाबत कथित पर्यावरण मंजुरी (EC) उल्लंघनाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 13 एप्रिल रोजी विभागाने पुणे...

error: Content is protected !!