Homeशहरअंबरनाथ अग्निशमन दल प्रमुखांचा शासनातर्फे स्मुतीचिन्ह देऊन गौरव

अंबरनाथ अग्निशमन दल प्रमुखांचा शासनातर्फे स्मुतीचिन्ह देऊन गौरव

अंबरनाथ दि.२४ ( प्रमोद दळवी ) : नगरपरिषद अंबरनाथ अग्निशमन दल प्रमुख भागवत श्रीराम सोनोने यांना नुकताच  अग्निशमन सेवा सप्ताह समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र शासनातर्फे स्मुर्तीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. भागवत सोनोने यांना १५ ऑगस्ट २०२५ रोजी मा. राष्ट्रपतीच्या वतीने जाहीर होणारे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झालेले आहे. त्यामुळे अंबनाथ न. पा. प्रशासनासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून सोनोने यांनी यापूर्वी कुळगांव बदलापूर व सध्या अंबरनाथ हया दोन्ही न.पाच्या अग्निशमन सेवा सक्षम व बळकट करणेसाठी अत्यंत मोलाची कामगिरी केली असून दोन्ही न.पाच्या अग्निशमन सेवेचे ऍडमिनिस्ट्रेशन व प्रॅक्टिकल कामकाज अत्यंत चोखपणे हाताळले आहे.

दोन्ही शहरात पाच नविन अग्निशमन केंद्र तयार करणे, नवीन अग्निशमन वाहने ताक्यात दाखल करणे, उंच इमारतीसाठी दोन्ही न. पा चा ५०% ५०% निधी व मा खासदार यांचा निधी वापरून परदेशी बनावटीचे ७० मी उंच शिडीचे वाहन आग व बचाव कार्यसाठी ताफयात दाखल करणे, विभागात मनुष्यबळ अत्यंत अपुरे असल्याने खाजगी तत्वावर प्रशिक्षित फायरमन भरती करणे, अग्निसुरक्षा अभियान राबविणे. सर्व शाळा सुरक्षा अभियान सर्व हॉस्पिटल सुरक्षा अभियान आपत्ती धोके व्यवस्थापन अभियान, वार्ड निहाय अग्निसुरक्षा अभियान दरवर्षी मान्सुनपूर्व तयारी अभियान इ. उपक्रम राबवून सोनोने यांनी सर्व शहरवाशी यांना आग व आपत्ती मुक्त ठेवणेचा आटोकाट प्रयत्न केला व करत आहेत तसेच प्रत्येक आग व आपत्तीच्या घटनास्थळी स्वतः हजर राहून आग व बचाव कार्य करणे २६ जुलै २००५ चा महापूर २०१९, २०२१ चे महापूर व पुरात अडकलेली महालक्ष्मी रेल्वे एक्सप्रेस तोक्ते चक्रीवादळ, निर्सग चक्रीवादळ यामुळे शहरावर आलेली नैसर्गिक आपत्ती इ. अभ्यासल्या असता. भागवत सोनोने यांचे कार्य कौतुकास्पद व प्रशासनीय आहे. यापुर्वी सुध्दा सोनोने यांना Safe India Hero Pius Awaod २०१७ २०२३ ताज हॉटेल मधील कार्यक्रमात गौरविण्यात आले आहे. सन २०२१ मध्ये महापुरात अडकलेली महालक्ष्मी एक्सप्रेस मधील प्रवाशांचे मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे जातीने स्वतः बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले तेव्हा सोनोने व त्यांचे सहकारी यांनी केलेले प्रवाशांचे केलेले बचाव कार्य त्याचबरोबर शहरात सुध्दा महापुराचे पाणी शिरल्याने विविध भागातून शेकडो नागरिकांचे केलेले बचाव कार्य, चक्रीवादळाने अंबरनाथ शहरात पडलेली १७४ झाडे व बदलापूर शहरात पडलेली ४६ झाडे दिवसरात्र एक करून सर्व पडलेली झाडे तोडून नागरिकांच्या अडचणी दूर केल्या.

या सर्व आपत्तीत सोनोने यांचे कार्याची दखल देत कुबनप प्रशासनाने त्यांना विशेष सेवा पदक देऊन गौरविले तसेच मा.शरदचंद्र पवार (राष्ट्रवादी कॉग्रेस) पक्षाकडून “बदलापूर भुषण पुरस्कार” देऊन सन्मान केला. त्यानंतरही संपूर्ण देशात आलेल्या कोव्हीड -१९ या महामारीत बदलापूर व अंबरनाथ या दोन्ही न पा च्या अग्निशमन कर्मचारी मदतीला घेऊन शहरातील फायर फायटर ने लगातार केलेली औषध फवारणी कोव्हीड हॉस्पिटलचे Fire Audit करणे अग्निशमन यंत्रणा प्रत्येक रग्णालयात बसवून घेणे प्रत्येक कोव्हीड हॉस्पिटल मधील डॉक्टर, नर्स स्टॉफ यांना आग बाबत प्रशिक्षण देणे हे सोनोने यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यामुळे सोनोने यांचे अग्निशमन सेवेतील योगदान पाहता अंबरनाथ व बदलापूर न पा प्रशासनाने कोरोना योध्दा पुरस्कार देऊन गौरव केला तसेच जुहू ग्रैन्टहयात या पंचताराकीत हॉटेलमध्ये महाराष्ट्र सोसायटीत वेल्फेअर असो (महासेवा) आणि रेड अॅन्ट यांच्या तर्फे आयोजित कार्यक्रमात सोनोने यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री मंगळप्रमात लोढा व मुंबईचे पालकमंत्री श्री दिपकजी केसरकर यांचे हस्ते व प्रसिध्द गायक, सुदेश भोसल या अभिनित्रर पदमिनी कोल्हापूर यांचक उपस्थितीत महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२३ व मानद डॉक्टरेट फायर अॅण्ड सेफटी हे दोन्ही पुरस्कार देऊन सन्मानित करणेत आले.

तसेच शहरातील बहुतेक सर्व शाळेतील विद्यार्थ्याना शिक्षकांना, महिला बचत गटांना, भगिनी मंडळातील महिलांना, रोटरी क्लब सदस्यांना डि मार्ट कर्मचऱ्यांना, डॉमिनो, मॅक्डोनाल कर्मचारी, उंच इमारतीमधील रहिवासी आस्थापनांना वेळोवेळी अग्निशमन व आपत्ती बाबत करत असलेली जनजागृती वाखणण्याजोगी आहे. वरील सर्व बाबी विचारात घेत महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन सेवा संचालनाव्दारा भागवत सोनोने यांनी अग्निशमन विभागासाठी केलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी मा. राष्ट्रपतीच्या वतीने जाहीर होणारे अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले असून सोनोने यांचे कार्याची पोच पावती म्हणून १४ ते २० एप्रिल अग्निशमन सेवा सप्ताह समारोप कार्यक्रम BKC मैदान मुबंई येथील दिमाखदार कार्यक्रमात व या कार्यक्रमासाठी अग्निशमन संचालनालयाने निमंत्रीत केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा राज्यमंत्री श्रीम. माधुरी मिताळ, विशेष अतिथी अवर मुख्यसचिव नगरविकास विभाग, मंत्रालय डॉ के.एच.गोविंदराज (IAS) सह सचिव श्रीम. प्रियंका छापवाले तसेच अवर सचिव लष्कस साहेब, विविध अग्निशमन सेवांचे मुख्य अग्निशमन अधिकारी इ. मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात राज्याचे अवर मुख्य सचिव आणि सह सचिपव यांचे हस्ते भागवत सोनोने यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ज्ञानगंगा शिक्षण संकुलात आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली

ठाणे दि. २६ ( प्रमोद दळवी )  : ज्ञानगंगा शिक्षण संकुल, कासारवडवली येथे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या डिग्री कॉलेज ऑफ...

अंबरनाथमध्ये साकार होणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक

- पूर्णाकृती पुतळ्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर -  खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश अंबरनाथ दि. २६ : अंबरनाथ शहरातील लाखो नागरिकांच्या...

६,६,६,६,०,६! सिएटल ऑर्काससाठी इयान हॉलंडच्या 17व्या षटकात मार्कस स्टोइनिस निडर झाला – पहा

मार्कस स्टॉइनिस (प्रतिमा: X) मार्कस स्टॉइनिसने 17 व्या षटकात पॉवर हिटिंगचे जबरदस्त प्रदर्शन केले, वॉशिंग्टन फ्रीडम सीमर इयान हॉलंडच्या चेंडूवर पाच षटकार खेचून...

ॲनालॉग फोटोग्राफीचा आनंद मुंबईने पुन्हा शोधला

तरुण छायाचित्रकार चित्रपट स्वीकारत आहेत, मुद्दाम ॲनालॉग कलेसाठी डिजिटल गतीचा व्यापार करत आहेत. मुंबईत आयोजित फोटोवॉक संयम आणि सजग शूटिंगला प्रोत्साहन देतात, सहभागी...

केतन अग्रवालच्या हत्येमागे विगचा कट? वडिलांचे म्हणणे आहे की सिया गोयलच्या कुटुंबाला त्याच्या केसांच्या...

पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या वडिलांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मुलाच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे...

error: Content is protected !!