Homeशहरधूळखात पडलेल्या १०९ जुन्या वाहनांचा वाहतूक पोलीस करणार लिलावा : जप्त वाहनांवरील...

धूळखात पडलेल्या १०९ जुन्या वाहनांचा वाहतूक पोलीस करणार लिलावा : जप्त वाहनांवरील दंडात्मक रक्कम भरून वाहने घेऊन जाण्यासाठी शेवटची संधी

उल्हासनगर दि. २४ ( प्रमोद दळवी ) : विठ्ठलवाडी वाहतूक उप विभागाच्या पोलिसांनी विविध कारवाईत जप्त केलेल्या व गेल्या अनेक वर्षांपासून धुळखात पडलेल्या १०९ वाहनांचा लिलावा करण्यात येणार आहे. जप्त असलेली आपली वाहने स्क्रॅप पासून वाचवण्याकरिता दंडात्मक रक्कम भरून वाहने घेऊन जाण्याचे आव्हान विठ्ठलवाडी वाहतूक उप विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी जप्त गाडीच्या चालक मालकांना केला आहे.

विठ्ठलवाडी वाहतूक उप  विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी या जप्त वाहनां संदर्भात सांगितले की ट्रॅफिक पोलीस ठाण्याच्या आवारात बऱ्याच वर्षापासून १०९ वाहने जप्त अवस्थेत पडलेले आहेत. या वाहनांवर मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण झाली आहे. धुळखात पडलेल्या वाहनांमुळे ट्रॅफिक पोलीस ठाण्याच्या आवारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याशिवाय या धुळीमुळे आणि घाणीमुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. त्यामुळे अशा जप्त वाहनांच्या स्क्रॅप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मालकांना त्यांच्या आरटीओ नंबरच्या आधारावरून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. ज्या लोकांची वाहने जप्त आहेत त्यांनी  दंड भरून वाहन सोडून घेण्याचा शेवटची संधी देण्यात आला आहे. त्यांनी कॅम्प नंबर -४ परिसरातील विठ्ठलवाडी ट्रॅफिक पोलीस ठाण्यात येऊन आपल्या जप्त वाहनाची पाहणी करून दंड भरून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की दिलेल्या मुदतीत जप्त करण्यात आलेल्या वाहनाचे मालक समोर आले नाही तर सर्व जप्त केलेल्या वाहनांचे स्क्रॅप केले जाणार आहे.

वाहतूक पोलिसांनी शहरवासीयांना आवाहन केले आहे की ज्यांचे वाहन जप्त आहेत त्यांनी त्वरित येऊन दंड भरून आपले वाहन त्या ठिकाणाहून घेऊन जावे त्यामुळे त्यांचे वाहन स्क्रॅप पासून वाचू शकेल. विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील सर्व वाहन चालकांना आवाहन करण्यात येत आहे की गेल्या काही बऱ्याच वर्षापासून कदाचित पंधरा-वीस वर्षा पूर्वी काही वाहने वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहेत. ती वाहने पोलिसांना कदाचित बेवारस स्थितीत किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाईत जप्त केले असावी. किंवा अनक्लेम वेहिकल असू शकते , कदाचित त्यांच्याकडे गाडीचे कागदपत्र नसावी, त्या कारणावरून देखील ती जप्त करण्यात आली असावी. एकूण १३० गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. आरटीओच्या नंबरावरून जप्त करण्यात आलेल्या गाडी मालकांना नोटीसी पाठवण्यात आल्या होत्या. जवळपास २१ गाडीच्या मालकांनी दंड भरून आपली वाहने घेऊन गेले आहेत.

आता १०९ वाहने जप्त केलेले स्थितीत धुळ खात पडले आहेत. या गाडीचे मालक व चालक यांचा ठाव ठिकाणा नसून आरटीओच्या  नंबर वरून यांना नोटीसी पाठवण्यात आल्या होत्या. काही नोटीसी परत आले आहेत. दोन दोन वेळा यांना नोटीस पाठवण्यात आले आहेत. याशिवाय वृत्तपत्रांमध्ये देखील या वाहनांबाबत या जप्त गाडीच्या मालकांना आवाहन करून आपल्या गाड्या घेऊन जाण्याचे सांगण्यात आले होते. आपल्या गाडीचे कागदपत्र दाखवून व दंडात्मक रक्कम भरून या गाड्या घेऊन जाण्याचे आव्हान करून पण या जप्त वाहनांच्या मालकांचे प्रतिसाद मिळत नाहीत. याशिवाय सर्व पोलीस ठाण्याला पत्राद्वारे देखील या जप्त असलेल्या वाहनांबाबत कळवण्यात आले आहे. या १०९  जप्त वाहनांमुळे ट्रॅफिक पोलीस ठाण्यातील हॉल देखील पूर्णपणे भरून गेले आहे. पोलीस अंमलदार, पोलीस मित्र, वार्डन यांच्या आराम करण्याच्या ठिकाणी देखील जप्त वाहन ठेवण्यात आले आहेत. धुळ खात पडलेल्या या वाहनांमुळे वाहतूक पोलीस ठाण्यामध्ये घाणीचे साम्राज्य तसेच रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या बिल्डिंगचे काम देखील सुरू होणार आहे. तसेच शासनाच्या १५० दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत जी अत्यंत जुनी वाहने आहेत त्यांचा लिलावा प्रक्रिया करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना मिळाल्या आहेत. त्या अनुषंगाने विठ्ठलवाडी वाहतूक उप विभाग कार्यालयात ज्या १०९  जप्त केलेले वाहने आहेत. त्यांचा आरटीओ इवोल्युशन करून लिलावा करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जप्त करण्यात आलेल्या वाहन चालक मालक यांना सुचित करण्यात येते की त्यांनी आपल्या गाड्यांची ओळख पटवून जे काही दंड आहे तो भरून किंवा ज्या वाहनावर दंड देखील आकारण्यात आला नाही अशा वाहनांचे कागदपत्र सादर करून आपली वाहने घेऊन जावे जेणेकरून ते वाहने स्क्रॅप पासून वाचू शकतील असे आव्हान वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत अ विरुद्ध श्रीलंका एक अनौपचारिक कसोटी: ध्रुव जुरेल आणि शेख रशीद यांनी दुसऱ्या...

IND A वि SL A: भारत अ संघ गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंका अ विरुद्ध 333/4 वर कमांडिंग पोझिशनमध्ये पहिल्या अनधिकृत कसोटीचा दुसरा दिवस पुन्हा...

मुंबई लोकल हत्या: आरोपी रोशन सुवर्णा दारूच्या नशेत घरी आला, सहप्रवाशाची हत्या करून रडला

नुकत्याच झालेल्या मुंबईच्या ट्रेनमध्ये झालेल्या चाकूने आरोपीच्या कुटुंबाला धक्का बसला आहे, ज्यांचा दावा आहे की तो दारूच्या नशेत आणि अस्वस्थ होऊन घरी धडकला...

‘ती दोषी असेल तर तिला त्याच गडावरून फेकून द्या’; केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी...

व्यापारी केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयलची आई पूजा गोयल यांनी गुरुवारी आपल्या मुलीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे: व्यापारी...

नोएडा विरुद्ध युरोप: ‘नोएडा युरोपपेक्षा चांगला आहे’: भारतीय प्रवाश्यांच्या वक्तव्यामुळे स्वीडन, जर्मनी आणि ऑस्ट्रियावर...

इंस्टाग्रामवर एका भारतीय प्रवाशाची युरोपियन ठिकाणांबद्दलची वैयक्तिक पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु प्रवासी अनमोल रैना (@anmolraina13) च्या व्हिडिओने “नोएडा युरोपपेक्षा चांगले आहे”...

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

error: Content is protected !!