मुरबाड दि.२६( सतिशचंद्र घरत): मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात रायगड जिल्ह्यातील चिरनेर गावालगतच्या अक्काबाईच्या जंगलात आदिवासींच्या न्याय हक्कासाठी नाग्या महादु कतकारी यांच्या नेतृत्वाखाली तात्कालीन ब्रिटिश साम्राज्याच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनवर ब्रिटिशांनी गोळीबार केला होता. त्या गोळीबारात कमी वय असलेल्या नाग्या महादु कतकारी यांना गोळी लागल्याने हुतात्मा झाले असल्याने, त्यांचा २५ सप्टेंबर हा बलिदान दिन म्हणून त्यांना मानवंदना देण्यात येते. याचाच भाग म्हणून मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी महिला पुरुषांच्या उपस्थितीत हुतात्मा नाग्या महादु कतकारी यांस मानवंदना देण्यात आली.

यावेळी मुरबाड तहसीलदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जुन्या काळातील विचारांच्या जोखडातून मुक्त व्हा आपल्या मुलांना शिक्षण द्या तसेच शासकीय कामांसाठी लागणारा दस्त ऐवज जपुन ठेवा त्याचबरोबर तहसील कार्यालयातील काही कागदपत्रे लागत असतील तर आमचे कार्यालय सदैव आपल्या पाठीशी उभे राहून सहकार्य करील या प्रसंगी तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या समवेत नायब तहसीलदार अमोल शिंदे तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























