पणजी दि.२६ :- सनातन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्थेच्यावतीने शंखनाद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून येत्या १७,१८ आणि १९ मे रोजी गोव्यातील फोंडा येथील रामनाथी आश्रमात हा महोत्सव होणार आहे.
हिंदू जनजागृती तसेच हिंदू राष्ट्र स्थापना हे सनातन संस्थेचे उद्दिष्ट असून या साठी संस्था ही अविरत कार्य करत आहे.सनातन संस्थेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून सनातन संस्थेचे प्रणेते डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या रामनाथी आश्रमात या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याची माहिती हिंदू जनजागृतीचे डॉ.उदय धुरी यांनी दिली. या शंखनाद महोत्सवात क्षात्रतेज सादरीकरण, संत तसेच धार्मिक नेत्यांकडून मार्गदर्शन आणि महायज्ञ दिव्य संगम होणार आहे.





























