पुणे दि.१ : महाराष्ट्र राज्य टंकलेखन लघुलेखन शासनमान्य संस्थांचे संघटना या शिखर संघटनेचे ६१ वे राज्यस्तरीय अधिवेशन जालना येथे घेण्याचे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मान्य करण्यात आले.

या बैठकीला राज्यातील समस्त कार्यकारिणीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि राज्यातील संस्थाचालकांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी डॉ. नंदकुमार बेडसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे उपस्थित होते बैठकीत बेडसे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले. समस्त राज्यातील संस्था चालकांनी दिनांक ४ व ५ एप्रिल रोजी जालना येथे एक दिवसाच्या अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली आहे. अगदी कमी वेळेत अधिवेशन घेण्याची संघटनेचे महासचिव संतोष दानी सर व जालना जिल्ह्याचे अध्यक्ष अरुण चव्हाण सर यांनी जे धाडस दाखवले त्याबद्दल त्यांना राज्य संघटनेच्या वतीने धन्यवाद देण्यात आले . या अधिवेशनाला प्रत्येक जिल्ह्याने पंचवीस हजार रुपयाची मदत करायचे आहे.

तसेच राज्याचे शिक्षणमंत्री नामदार श्री दादाजी भुसे यांना महाराष्ट्र राज्य संगणक टंकलेखन संघटनेचे जालना येथील अधिवेशनाचे निमंत्रण मालेगाव तालुक्यातील सौदाने या गावी देण्यात आले. याप्रसंगी सरपंच चेतन पवार, राज्य संघटना अध्यक्ष प्रकाश कराळे, माजी महासचिव हेमंत ढमढेरे, संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष नाईकवाडे, बीड जिल्हा सचिव भागवत ढाकणे, ज्येष्ठ संस्था चालक श्री.अतुल कासार सर. नामदार साहेबांचे परममित्र श्री. ॲड. सुधीर अक्कार , नाशिक जिल्हा अध्यक्ष महेंद्र देवरे, योगेश देवरे सर यांनी ग्रेट भेट घडवून दिली. आज अधिवेशन आणि mkcl CCPT संदर्भात चर्चा होऊन सांगली जिल्ह्याचे आमदार, खासदार यांची पत्र मंत्री दादाजी भुसे यांना देण्यात आली. ते पत्र मुख्यमंत्री यांना सुपूर्त करणार असून चर्चाही करणार आहेत असा शब्द दादाजी भुसे यांनी दिला आहे.





























