Homeदेश-विदेशशिवसेनेची टीम श्रीनगर मध्ये दाखल ; राज्यातील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप परत आणण्याचे...

शिवसेनेची टीम श्रीनगर मध्ये दाखल ; राज्यातील अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला वेग

श्रीनगर :- जम्मू आणि काश्मीरमधील पेहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे या पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना सुखरूप राज्यात परत आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले असतानाच आता तिथे अडकलेल्या इतर पर्यटकांना सुखरूप राज्यात आणण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे मदत पथक काल रात्रीच मुंबईहून श्रीनगरसाठी रवाना झाले आहे. या पथकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर, डोंबिवलीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना विमानात बसवून रवाना केल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या बाकीच्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

ठाणे आणि डोंबिवली येथून काश्मीर सहलीसाठी गेलेल्या ४० आणि ५५ जणांच्या ग्रुपशी या मदत पथकाने संपर्क केला असून त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच त्यांच्यासह तिथे अडकलेल्या राज्यातील इतर पर्यटकांच्या देखील ते संपर्कात असून त्यांना देखील सुखरूप राज्यात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या मदत कार्यावर लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीत राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. मात्र सध्या श्रीनगर मधील परिस्थिती नाजूक असून पर्यटकांना परत आणण्यासाठी यंत्रणांशी संपर्क साधून समन्वय साधावा लागत आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे शर्थीचे प्रयत्न शिवसेनेच्या मदत पथकाच्या वतीने करण्यात येत असून लवकरच केंद्र शासनाच्या मदतीने या पर्यटकांना सुखरूपपणे राज्यात आणले जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मर्यादित पुरवठ्यावर कार्यालयाचे भाडे स्थिर आहे

पुणे: शहरातील व्यावसायिक जागांसाठी भाडेतत्त्वावरील भाडे स्थिर राहिल्याने विकासकांनी कार्यालयीन शोषण कमी होण्याची चिन्हे दाखवूनही नवीन पुरवठा प्रतिबंधित करणे सुरू ठेवले आहे.नाइट...

बीएमसीच्या 1,348 कोटींच्या प्राइम लोअर परळ प्लॉटसाठी चार बोलीदार रिंगणात

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने बीएमसीला लोअर परळमधील सहा एकर जागेवर पुन्हा हक्क सांगण्याची परवानगी दिल्यानंतर वर्षभरानंतर, नागरी संस्था आता उच्च मूल्याच्या भूखंडासाठी विकासक...

PMC ओव्हरहेड केबल्सच्या विरोधात मोहीम थांबवणार

पुणे: पुणे महानगरपालिकेने केंद्रीय ऊर्जा आणि दळणवळण मंत्रालयाच्या 2023-24 निर्देशांसह संरेखित नियामक फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी, लॉन्च झाल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर ओव्हरहेड केबल्स काढण्याची मोहीम...

IPL 2026: GT पूर्ण क्लिनिकल चेस म्हणून शुभमन गिल चमकला, KKR अजिंक्य राहिला

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल (एपी फोटो/अजित सोलंकी) कागिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज यांनी शिस्तबद्ध आणि भेदक नवीन चेंडूच्या स्पेलसह विजय निश्चित केल्यानंतर...

लपविलेले स्कफ: तुमचा ग्लास कुकटॉप साफ करण्याची दिनचर्या चांगल्यापेक्षा जास्त नुकसान का करत असेल...

तुमच्या चकाकणाऱ्या काचेच्या कूकटॉपवर कोळ्याच्या जाळ्याचे रहस्यमय स्क्रॅच विकसित होऊ शकतात, जड भांड्यांमधून नव्हे तर तुमच्या साफसफाईच्या साधनांमधून. कोरड्या घासणे किंवा कोरड्या चिंध्याने...

error: Content is protected !!