Homeशहरशिवसेना महानगरप्रमुख श्री. राजेंद्र चौधरी यांचा वाढदिवस “आधारतीर्थ” अनाथ आश्रमातील बालकांसोबत उत्साहात...

शिवसेना महानगरप्रमुख श्री. राजेंद्र चौधरी यांचा वाढदिवस “आधारतीर्थ” अनाथ आश्रमातील बालकांसोबत उत्साहात साजरा

उल्हासनगर दि. १ : शिवसेनेचे खंबीर नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक असलेले महानगरप्रमुख श्री. राजेंद्र चौधरी यांचा वाढदिवस यंदा एका अनोख्या आणि हृदयस्पर्शी पद्धतीने साजरा झाला. त्र्यंबकेश्वर येथील “आधारतीर्थ” अनाथ आश्रमातील निरागस बालकांनी आपल्या प्रेमळ शुभेच्छांसह उल्हासनगर येथे साहेबांची भेट घेतली, आणि हा सोहळा माणुसकीच्या बंधाने उजळून निघाला.

१ जून रोजी दुपारी ११ वाजता विठ्ठलवाडी येथील शिवसेना शाखेत आयोजित या कार्यक्रमाला युवासेना उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने राजेंद्र (बाळा) श्रीखंडे, युवासेना शहर अध्यक्ष, यांनी नेतृत्व केले. या प्रसंगी अनाथ आश्रमातील मुलांनी आपल्या हातांनी बनवलेल्या भेटवस्तू आणि शुभेच्छा पत्रे साहेबांना भेट दिली, ज्याने उपस्थित सर्वांचे मन जिंकले. साहेबांनीही मुलांशी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांना प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद दिले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक जाणिवेचा संदेश. “आधारतीर्थ” अनाथ आश्रमातील मुलांना आधार देण्याच्या हेतूने आयोजित या भेटीने साहेबांचे सामाजिक कार्य आणि त्यांचे संवेदनशील नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

उपस्थित शिवसैनिक, युवासेना कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. युवासेना शहर अध्यक्ष  राजेंद्र श्रीखंडे यांनी सांगितले, “साहेबांचा वाढदिवस हा केवळ उत्सव नसून, समाजातील वंचित घटकांना जवळ आणण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न आहे. त्यांच्या कार्याला आणि माणुसकीला सलाम करत हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. या सोहळ्याला उल्हासनगरातील शिवसेना कार्यकर्ते, स्थानिक नेते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवासेना उल्हासनगर शहर शाखेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. हा वाढदिवस सोहळा श्री. राजेंद्र चौधरी साहेबांच्या सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वाचा गौरव करणारा ठरला. त्यांच्या कार्याला पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास बालाजी किणीकर (आमदार अंबरनाथ विधानसभा क्षेत्र),दिलीप गायकवाड (उपजिल्हा प्रमुख शिवसेना),कलवंत सिंह सहोता (बिट्टूभाई)(मा.नगरसेवक तथा उपशहर प्रमुख),के.डी.तिवारी (उत्तर भारतीय सेल शहरप्रमुख),सुरेश सोनवणे(उपशहर प्रमुख), शिवसेना विभाग प्रमुख महेंद्र पाटील, विल्सन डीसोजा, केशव ओवळेकर, पप्पु वाघ, विजु पाटील ,दिपक रत्नाकर (युवासेना शहर सचिव),  कल्पेश वाघ(युवासेना उपशहर अध्यक्ष ), निलेश माने( युवासेना उपशहर अध्यक्ष),जावेद शेख ( युवासेना उपशहर अध्यक्ष ), रोहन निकारगे ( युवासेना उपशहर अध्यक्ष), कु.सचिन पाटील( विभाग अध्यक्ष),कु.गोपाल चव्हाण ( विभाग अध्यक्ष),कु.प्रशांत घाडगे( उपविभाग अध्यक्ष), आणि विभाग क्रमांक १,२,३ शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष व समस्त शिवसैनिक, युवासैनिक नागरिक उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केप वर्देने विश्वचषक इतिहास रचला, दुर्मिळ पात्रता मैलाचा दगड पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन...

केप वर्देच्या खेळाडूंनी ह्यूस्टन येथे शुक्रवार, २६ जून, २०१६ रोजी विश्वचषक गट एच सॉकर सामन्यानंतर सौदी अरेबियासोबत ०-० अशी बरोबरी साधली. (एपी फोटो/डेव्हिड...

बदलाचे स्टीयरिंग व्हील: मुंबई अग्निशमन दलाला पहिली महिला चालक-ऑपरेटर मिळाली

मुंबई अग्निशमन दलाने 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची पहिली महिला चालक-सह-ऑपरेटर म्हणून नियुक्ती करून इतिहास रचला आहे. मुंबई: पुढच्या वेळी सायरन वाजवून मुंबईच्या...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला फिक्स केले: पालकांनी तिच्या भावनांकडे दुर्लक्ष...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

“हे खरंच वाटलं…” तिने तिच्या लग्नात तिच्या दिवंगत वडिलांचा जुना कॅमेरा आणला; फोटोंमध्ये जे...

अशी काही अनुपस्थिती आहेत जी आपल्याला कधीही सोडत नाहीत. ते शांतपणे आयुष्यातील सर्वात मोठे टप्पे पाळतात, उत्सवाच्या क्षणांना त्या लोकांच्या आठवणींमध्ये बदलतात जे तिथे...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

error: Content is protected !!