Homeशहरवैशाखरे शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जेदार शालेय साहित्याचे वाटप

वैशाखरे शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जेदार शालेय साहित्याचे वाटप

मुरबाड दि. ११ : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कायम पत्रकारीते बरोबर सामाजिक कामात अग्रेसर रहात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांची मदत करणे इत्यादी समाजपयोगी उपक्रम राबविण्यासाठी प्राधान्य देत आला आहे. याचाच भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील केंद्र शाळा वैशाखरे येथील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे व ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम असे दर्जेदार शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

या उपक्रमात डॉ विश्वासराव आरोटे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की म्हणाले की तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या पदावर काम करीत असताना मंदिरांना आर्थिक मदत करण्यापेक्षा शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात द्या कारण तुम्ही कुठेही आर्थिक मदत केली तरी कोणीही लक्षात ठेवणार नाही. परंतु शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला तर त्या मदतीची आठवण कायमस्वरूपी लक्षात ठेवली जाईल. तर ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले की तुम्हाला देण्यात आलेल्या वह्यानवर सुंदर अश्या माळशेज घाटा बाबत लेखन करा त्याचबरोबर स्वातंत्र्य सैनिक हिराजी गोमाजी पाटील, भाई कोतवाल, यांच्या जीवनावर निबंध लिहा असेही त्यांनी सांगितले तसेच वैशाखरे गावाचे पोलिस पाटील विश्वनाथ नवले व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अंकुश भोईर यांनी उपस्थित राहुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नरेश म्हाडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिंदे मॅडम यांनी केले विद्यार्थ्यांना उत्तम दर्जेदार शालेय साहित्याचे वाटप करण्यासाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष शेखर भोईर, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गायकर, पदाधिकारी सचिन पोतदार, राजीव चंदने, सतिशचंद्र घरत, गोविंद भोईर, चंद्रकांत भोईर नितेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले तर शाळेचे मुख्याध्यापक मनोहर घुडे शिक्षक नंदकुमार ईसामे बाळु हिंदोळा, गोविंद शिद, शिक्षीका मनीषा बोरुडे, शिंदे मॅडम, माधुरी घरत, प्रियांका नवले यांनी विशेष सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

FIFA विश्वचषक 2026 उद्घाटन समारंभ लाइव्ह अपडेट्स: FIFA विश्वचषक 2026 सुरू होताच शकीरा एस्टाडिओ...

FIFA विश्वचषक 2026 उद्घाटन समारंभ लाइव्ह अपडेट्स: FIFA विश्वचषक 2026 उद्घाटन समारंभ आणि मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या आमच्या थेट कव्हरेजमध्ये...

जुहूच्या इमारतीला लागलेल्या आगीत फ्लॅट जळून खाक, आठ जण जखमी

मुंबई : जुहूमधील JVPD रोड क्रमांक 12 वरील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सकाळी 7.40 च्या सुमारास आग लागल्याने आठ जण जखमी झाले....

बॉम्बच्या धमकीच्या ईमेलमुळे पीएमसी मुख्यालयातील कामकाजात अडथळा

बुधवारी सकाळी बॉम्बच्या भीतीने पुणे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला. पीएमसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, महापौर कार्यालयाला बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारा ईमेल आल्यानंतर नागरी मुख्यालय...

व्यक्तिमत्व चाचणी: या पर्वतावरील तुम्हाला सर्वात जास्त आकर्षित करणारी जागा तुमच्या जीवनात सध्या कोणत्या...

फोटो: दशा ताकिशो / इंस्टाग्राम तुम्ही कधी डोंगराकडे पाहिले आहे आणि तुमच्या आत काहीतरी शांतपणे बदलल्याचे जाणवले आहे का? एखाद्या विशिष्ट ठिकाणी सहजतेने...

महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली

महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रकल्पासाठी आक्षेप घेऊनही सल्लागाराला मान्यता दिली पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी मोशी येथील छत्रपती संभाजी...

error: Content is protected !!