उल्हासनगर दि. १९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४ परिसरात राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेने गॅस सिलेंडर घेण्यासाठी आर्थिक मदतीची मागणी वंचित बहुजन आघाडीकडे करतात तिला आर्थिक मदत देण्यात आली आहे. गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव वंचित बहुजन आघाडी तत्पर असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर संघटक देवानंद नारायण शिरसाट यांनी सांगितले

उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील कुर्ला कॅम्प रोड साईबाबा मंदिराजवळ वयोवृद्ध मंजुळाबाई राऊत या राहतात. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर संघटक देवानंद शिरसाट आणि मंगलाताई देवानंद शिरसाट यांच्याकडे गॅस सिलेंडर घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याची मागणी केली. शिरसाट दाम्पत्याने त्या आजींना त्वरित मदत करून सहकार्य केले. आपल्याला वेळीच आर्थिक मदत केल्याने त्या आजींनी दोघांना आशीर्वाद देत आभार मानले. त्याप्रसंगी दिवाकर खळे ,रोशन पगारे गुरुजी (भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष )व निशांत कांबळे हे कार्यकर्ते उपस्थित होते





























