Homeशहररोजगाराच्या आशेवर बचत गटातील ५० लाडक्या बहिणी : स्टॉल चालले गंजून

रोजगाराच्या आशेवर बचत गटातील ५० लाडक्या बहिणी : स्टॉल चालले गंजून

  • उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभारा

उल्हासागर दि १५  ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरांमधील बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने तब्बल ५०  लोखंडी स्टॉल सुमारे एक कोटी २४  लाख १५ हजार ७५० रुपयाचे खरेदी केले आहेत. जवळपास बचत गटातील ५० लाडक्या बहिणींना अद्याप पर्यंत ते स्टॉल देण्यात न आल्याने त्या महिला रोजगाराच्या आशेवर असून धुळखात पडलेले ते स्टॉल आता गंजू लागले आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या या अजब कारभाराबाबत बचत गटातील महिला वर्गांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

उल्हासनगर मधील महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, महापालिकेने तब्बल ५० लोखंडी स्टॉल खरेदी केले. ५० पात्र महिला बचत गटाला स्टॉलचे वाटप ६ महिन्यापुर्वी होणार होते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून स्टॉलचे वाटप न झाल्याने, ते गंजत चालले आहेत, आता भंगारात काढणार का? असा प्रश्न बचत गटाच्या महिलांना पडला आहे.

उल्हासनगर महापालिका महिला व बाल कल्याण विकास विभागाने महिला बचत गटांना आठ बाय आठ आकाराचे एकूण ५० लोखंडी स्टॉल देण्याचा निर्णय घेतला. एका स्टॉलची किंमत २ लाख ४८ हजार ३१५ असून ५० स्टॉल १ कोटी २४ लाख १५ हजार ७५० रुपयाला खरेदी केले आहेत. परंतु वाटपासाठी प्रमुख पाहुण्यांची तारीख मिळत नसल्याने वाटपाचा कार्यक्रम वारंवार पुढे ढकलण्याची वेळ विभागावर आली असल्याचे बोलले जात आहे. महिला बचत गटांना लोखंडी स्टॉलचे वाटप कागदोपत्री झाले आहे. स्टॉलचा प्रत्यक्षात ताबा देण्यात आला नाही. उल्हासनगर ३ रेल्वे स्टेशन जवळ ६ महिन्यापासुन ठेवलेल्या स्टॉलची दुरवस्था झाली आहे. पाऊस व  सांडपाण्यामुळे स्टॉल गंजून चालले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुसळधार पावसात खराब झालेल्या पालखी मार्गांची जलद दुरुस्तीचा दावा पीएमसीने केला आहे

पालखी मार्गाचा भाग असलेल्या शंकरशेठ रस्त्याची दुरवस्था झाली आहे पुणे : नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात नुकसान झालेल्या आषाढी वारी पालखी मार्गातील काही भाग...

इंग्लंड महिला 11.0 षटकात 21/1

भारत विरुद्ध इंग्लंड महिला लाइव्ह स्कोअर, वन-ऑफ कसोटी: भारताने शिस्तबद्ध फलंदाजीचा प्रयत्न केला परंतु लॉर्ड्सवरील महिला कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या उशिरा पुनरुत्थानामुळे संपूर्ण नियंत्रण...

बॉलीवूडमध्ये हेमा मालिनी यांची हीरक जयंती साजरी होत असताना ड्रीम गर्ल पूर्ण वर्तुळात आली...

हेमा मालिनी यांना चित्रपटसृष्टीत साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हिंदी चित्रपटसृष्टी जमली होती. नॉस्टॅल्जियाच्या संध्याकाळमध्ये स्पष्ट संभाषणे आणि संगीत सादरीकरण होते. उद्योगातील दिग्गजांनी पडद्यामागील...

वारकऱ्यांनी पुण्यात मुक्काम केल्याने प्रार्थना, विश्रांती आणि सेवा

पुण्यातील कॉलेजमधील फिजिओथेरपीचे विद्यार्थी वारकऱ्यांना पायाची मालिश आणि स्ट्रेचिंग सेशन्स देतात पुणे : पुण्यात थांबलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखीच्या...

एर्लिंग हॅलंडचे आई आणि वडील कोण आहेत? नॉर्वेच्या सुपरस्टारच्या मागे क्रीडा परिवार

एर्लिंग हॅलँडचा जागतिक फुटबॉलच्या शीर्षस्थानी उदयास अगणित प्रसंगी विलक्षण म्हणून वर्णन केले गेले आहे परंतु जेव्हा आपण तो ज्या कुटुंबातून आला त्याचा...

error: Content is protected !!