अंबरनाथ दि. २७ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ व बदलापूर शहरातील वाढती रेल्वे प्रवाश्नाची लोकसंख्या आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या समस्या व अडचणी लक्षात घेता तसेच सदर अडचणी दूर कराव्यात ह्या साठी संयुक्त भारत पक्ष यांचे उपोषण सोडवण्या करिता मध्य रेल्वे मुंबई विभागीय व्यवस्थापक (DRM) हिरेश मीना यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती .

त्यावेळी १) चिखलोली रेल्वे स्थानाकाचे काम लवकर पूर्ण करावे म्हणजे प्रवासी विभागले जातील.२) बदलापूर स्थानक येथे स्व. चेतना अक्षय देवरे ह्या महिलेचा फलाटावर पडून मृत्यू झाला व एक बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थी मृत्यू पावला असून त्यांच्या कुटुंबियांना मृत्यू भरपाई अंतर्गत लवकरात लवकर मदत मिळावी.
३) रेल्वे लाईन ५ व ६ चे,फलाट वाढवण्याचे,शेडचे,स्वच्छता गृहाचे, पाणपोईचे, बारिगेटिंगचे तसेच इतर अपूर्ण कामे पावसाळ्या पूर्व पूर्ण करण्यात यावी. ४) रेल्वे सेवा नियमित वेळेनुसार असावी जेणेकरून मोठी कोंडी टाळण्यात येईल. ५)सुरक्षा वाढवावी, जास्तीचे कॅमेरे बसवावेत ६)स्वयंचलित जिना २४ तास चालू असावा ,७) १५ दाब्यांची रेल्वे लाकरत लवकर सेवेत आणावी तसेच प्रवास्यां मध्ये जागृगता वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात ई. महत्वाचा विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली
लवकरतात लवकर सर्व काही सुरळीत होऊन प्रवास्यांचा ताण कमी करू अशी ग्वाही मध्य रेल्वे मुंबई विभागीय व्यवस्थापक यांनी दिली. सादर बैठकीस आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, बदलापूर शिवसेना शहरप्रमुख मा. नागराध्यक्ष. वामन म्हात्रे, नगरसेवक संजय भोईर, संयुक्त भारत पक्ष यांचे उपोषणकर्ते तसेच रेल्वे विभागचे अधिकारी उपस्थित होते.





























