बदलापूर दि ५ ( प्रमोद दळवी ) : गेल्या दोन दिवसापासून सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापूर पश्चिमेकडील मांजर्ली परिसरात नाल्या जवळील संरक्षण भिंत खचून ती कोसळल्याने त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पालिकेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खसलेल्या नाल्याजवळ बॅरिकेट्स लावून तो मार्ग बंद केला आहे.

मुसळधार पावसाचा फटका आता बदलापूर शहरालाही बसू लागलाय. पश्चिमेकडील मांजर्ली परिसरात रस्ता खचून नालालगतची संरक्षक भिंत कोसळली आहे. भिंत कोसळल्याने रस्त्याखालील माती वाहून गेली व मोठा भगदाड पडला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने तातडीने बॅरिगेटिंग करून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने तो रस्ता धोकादायक मानला जात आहे. परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरात आता छोट्या-मोठ्या दुर्घटना होण्यास सुरुवात झाली आहे मांजर्ली परिसरात सिमेंट काँक्रीटच्या शेजारी असलेली संरक्षण भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली. नाल्याला बांधलेली ही संरक्षण भिंत होती. विशेष म्हणजे त्या लगतच फेवर ब्लॉकचा समांतर रस्ता आहे. तो रस्ता देखील पूर्णपणे खचलेला आहे. तो रस्ता कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. सिमेंट काँक्रीटच्या त्या रस्त्याला भेगा देखील पडलेल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता देखील खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेला जेव्हा ही भिंत कोसळण्याची माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन बैरिगेटिंग केले. नाल्याच्या शेजारी असणारी ही संरक्षण भिंत आहे या ठिकाणाचा जो नाला आहे उल्हास नदीला जेव्हा महापूर येतो तेव्हा या नाल्यातला पाणी पूर्ण बाहेर येतो आणि स्थानिक लोकांच्या घरामध्ये शिरतो. त्यामुळे या नाल्यातील पाण्यापासून बचाव व्हावा त्यामुळे ही संरक्षण भिंत नाल्यालगत बांधण्यात आली होती. मात्र आता ही संरक्षण भिंत कोसळल्याने व त्या ठिकाणी अनेक झाडे देखील कोसळल्याने नागरिकांनी आता या ठिकाणी येऊ नये त्यामुळे हा रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने काही काळ बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता तो सुरू करण्यात आला आहे. भिंत खचल्यामुळे आता सुरक्षेचा उपाय म्हणून त्या ठिकाणी नाल्यालगत बॅरिगेटिंग करून तो मार्ग बंद करण्यात आला आहे.





























