Homeशहरमुसळधार पावसामुळे बदलापुरात नाल्या जवळील संरक्षण भिंत कोसळली

मुसळधार पावसामुळे बदलापुरात नाल्या जवळील संरक्षण भिंत कोसळली

बदलापूर दि ५ ( प्रमोद दळवी ) : गेल्या दोन दिवसापासून सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे बदलापूर पश्चिमेकडील मांजर्ली परिसरात नाल्या जवळील संरक्षण भिंत खचून ती कोसळल्याने त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पालिकेने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खसलेल्या नाल्याजवळ बॅरिकेट्स लावून तो मार्ग बंद केला आहे.

मुसळधार पावसाचा फटका आता बदलापूर शहरालाही बसू लागलाय. पश्चिमेकडील मांजर्ली परिसरात रस्ता खचून नालालगतची संरक्षक भिंत कोसळली आहे. भिंत कोसळल्याने रस्त्याखालील माती वाहून गेली व मोठा भगदाड पडला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने तातडीने बॅरिगेटिंग करून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने तो रस्ता धोकादायक मानला जात आहे. परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे बदलापूर शहरात आता छोट्या-मोठ्या दुर्घटना होण्यास सुरुवात झाली आहे मांजर्ली परिसरात सिमेंट काँक्रीटच्या शेजारी असलेली संरक्षण भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली. नाल्याला बांधलेली ही संरक्षण भिंत होती. विशेष म्हणजे त्या लगतच फेवर ब्लॉकचा समांतर रस्ता आहे. तो रस्ता देखील पूर्णपणे खचलेला आहे. तो रस्ता कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. सिमेंट काँक्रीटच्या त्या रस्त्याला भेगा देखील पडलेल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता देखील खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेला जेव्हा ही भिंत कोसळण्याची माहिती मिळाली त्यावेळी त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन बैरिगेटिंग केले. नाल्याच्या शेजारी असणारी ही संरक्षण भिंत आहे या ठिकाणाचा जो नाला आहे उल्हास नदीला जेव्हा महापूर येतो तेव्हा या नाल्यातला पाणी पूर्ण बाहेर येतो आणि स्थानिक लोकांच्या घरामध्ये शिरतो. त्यामुळे या नाल्यातील पाण्यापासून बचाव व्हावा त्यामुळे ही संरक्षण भिंत नाल्यालगत बांधण्यात आली होती. मात्र आता ही संरक्षण भिंत कोसळल्याने व त्या ठिकाणी अनेक झाडे देखील कोसळल्याने नागरिकांनी आता या ठिकाणी येऊ नये त्यामुळे  हा रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने काही काळ बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता तो सुरू करण्यात आला आहे. भिंत खचल्यामुळे आता सुरक्षेचा उपाय म्हणून त्या ठिकाणी नाल्यालगत बॅरिगेटिंग करून तो मार्ग बंद करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालच्या काकांनी रियाल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना दिलेला धक्का...

देवीचंद अग्रवाल (सी) यांच्या अंत्यसंस्कारानंतर बोलताना कुलदीप अग्रवाल (एल) म्हणाले की, 17 दिवसांच्या कालावधीत केतन आणि त्याचे आजोबा या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त...

आमदार बालाजी किणीकर यांच्या पुढाकारातून कामगार वर्गाला शासकीय योजनांचा लाभ मिळण्याकरिता कामगार नोंदणी अभियान...

अंबरनाथ दि.५ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील कामगार वर्गाला शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने आमदार बालाजी किणीकर विशेष पुढाकारातून...

पीसीबीने शान मसूदची हकालपट्टी, बाबर आझमकडे कसोटी कर्णधारपद सोपवले

पाकिस्तानचा बाबर आझम (AP/PTI) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) बाबर आझमला वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्धच्या दोन महत्त्वाच्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप असाइनमेंटपूर्वी राष्ट्रीय संघाचा...

विद्यार्थी प्रवेश चुकल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा कल्याण महाविद्यालयाला दंड; पात्रता अधिसूचनेत निष्काळजीपणासाठी रु. 1...

अपात्रता असूनही बीएमएस अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याला प्रवेश दिल्याबद्दल आणि नंतर उशिरा माहिती दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने कल्याणच्या एका महाविद्यालयाला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला...

मुसळधार पावसामुळे पुणे सोसायटीत भिंत कोसळली, 14 वाहनांचे नुकसान

मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे पुण्यातील कात्रज परिसरात एका निवासी सोसायटीची कंपाऊंड भिंत कोसळली, किमान 14 वाहनांचे नुकसान झाले (फोटो क्रेडिट: X) पुणे :...

error: Content is protected !!