मुरबाड दि.७ : सततच्या बदलत्या हवामानामुळे सध्या ग्रामीण भागात सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी सारख्या अजारांच्या रुग्णाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन सरकारी तसेच खासगी रुग्णालयात सर्वच वयोगटातील रुग्णांच्या रांगा लागलेल्या निदर्शनास येत आहेत.

वैशिष्ट्य म्हणजे सरकारी रुग्णालयात सर्वच आजारांवर तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आजारांवर उपचार करण्यात येत असुन गोळ्या औषधे मोफत देण्यात येत आहेत तरी सुद्धा काही रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असल्याने खाजगी रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांनकडुन भरमसाठ फी अकारुन लुट करीत आहेत. वास्तविक सरकारी रुग्णालयात रक्तातील साखरेचे प्रमाण, एक्सरे, ईसीजी ,रक्तदाब इत्यादी शारीरिक तपासण्या मोफत करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याने रुग्णांनी संबंधित यंत्रणेच्या माध्यमातून सर्व चाचण्या करून घेतल्यास फायदेशीर ठरेल. सध्या टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची उपचारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन येत आहे.






























