Homeशिक्षण-प्रशिक्षणमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यासोबत मिटिंग संपन्न : अनेक विविध मुख्य...

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यासोबत मिटिंग संपन्न : अनेक विविध मुख्य विषयांवर चर्चा, अनेक मागणी मान्य

पुणे दि.३० : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, अध्यक्ष डॉ. महेश पालकर, आयुक्त सौ. अनुराधा ओक मॅडम, सहाय्यक आयुक्त सौ. मंगल व्हावळ मॅडम, अधीक्षक सौ. अर्चना सरदार मॅडम MSCE पुणेचे अन्य पदाधिकारी तसेच MSCEIA मुंबईचे अध्यक्ष प्रकाशजी कराळे सर, वरिष्ठ उपाध्यक्ष घनश्याम कुंभाळकर सर, महासचिव संतोष दाणी सर,. संजय नाईक सर तसेच सर्व जिल्हा प्रतिनिधी, अन्य सर्व MSCEIA चे पदाधिकारी यांची विविध मुख्य विषय संदर्भात चर्चा करण्याकरिता मिटिंग आयोजित करण्यात आली होती.

आयोजित करण्यात आलेल्या या मिटिंगमध्ये विविध विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी अनेक समस्या व मुद्दे मांडण्यात आले १)  जून/जुलै-२०२५ च्या मराठी आणि हिंदी या विषयात परीक्षा सॉफ्टवेअर आणि अन्य कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व परीक्षा केंद्रावर असंख्य विद्यार्थ्यांवर आलेल्या अडचणी आणि असे प्राब्लेम आलेल्या सर्व विद्यार्थी यांची यादी राज्याध्यक्ष श्री. कराळे सर यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, अध्यक्ष डॉ. महेश पालकर, आयुक्त सौ. अनुराधा ओक मॅडम यांना सादर केली तसेच या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी या सर्व विद्यार्थ्यांची फेर परीक्षा घेण्याची मागणी MSCEIA संघटनेकडून करण्यात आली. यावर प.प अध्यक्षसो यांनी विद्यार्थ्यांचे सत्र वाया जाऊ नये आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या बॅचची रिपीटर परीक्षा घेण्याचे मान्य केले.

२) ISM 6.2 हे परीक्षा केंद्रावरील कॉम्प्युटरवर इन्स्टॉल केलेले न वापरता परीक्षा घेणाऱ्या गोपनीय एजन्सीच्या परीक्षेच्या सॉफ्टवेअर अप्लिकेशनमधील Built-in ISM मराठी आणि हिंदी परीक्षेसासाठी भविष्यात वापरण्यात येणार आहे. येणाऱ्या रिपीटर परीक्षेसाठी त्याची प्रायोगिक/प्रात्यक्षिक घेऊन जसे की इंग्रजीच्या परीक्षा या तांत्रिक अडचणीमुक्त होतात; त्याप्रमाणे मराठी/हिंदी परीक्षेसासाठी विनरच्या सॉफ्टवेअर मधीलच Built-in ISM चा वापर करण्यात येणार आहे. ३)  इंग्रजी ५०  व इंग्रजी ६० हा कोर्स करणाऱ्या शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी यांना संस्थेमधूनच परीक्षा फॉर्म फी भरून आवश्यक ते पुरावे सादर करून परीक्षेला बहिस्थरित्या बसता येईल. अशा विद्यार्थ्यांना हजेरीची कोणत्याही प्रकारची अट नसेल. ४) इंग्रजी ५०  व इंग्रजी ६०  या नव्याने समावेश झालेल्या कोर्स च्या पूर्व-अट/प्री- कंडिशन बाबत तसेच परीक्षेच्या SYLLABUS बाबत आवश्यक ती सर्व चर्चा झाली.

५)  २०२३ च्या सुधारित नियमावली नुसार,  संस्था-स्थलांतर करताना अंतर हे सर्व महानगरपालिका (अ,ब,क,ड) व नगरपालिका यांच्याकरिता शहरी भागामध्ये ५०० मीटर आणि ग्रामीण भागामध्ये एक कि.मी. चे असेल.(सुधारित २०२३ च्या नियमावलीत  उल्लेख असलेल्या अंतराच्या बाबतीत कोणताही बदल नाही. ६)  सी. सी. टी. व्ही आणि  बायोमेट्रिक न बसवलेल्या संस्था तसेच बायोमेट्रिक हजेरी न घेणाऱ्या संस्थावर कारवाई करणेबाबत संघटनेकडून मागणी करणेत आली, बाहेरील जिल्ह्यातील कोणतीही बायोमेट्रिक हजेरी न घेता फक्त परीक्षा फॉर्म भरून घेणाऱ्या संस्थांवर कारवाई करणेबाबत चर्चा झाली. ७) GCC-TBC परीक्षेसाठी शैक्षणिक अर्हता पूर्वीप्रमाणेच इयत्ता ८  वी पास करण्याचे मा अध्यक्ष, परीक्षा परिषद पुणे यांनी मान्य केले. (संघटनेकडून शैक्षणिक अहर्ता ही ६ वी पास करणेबाबत मागणी करणेत आली, अध्यक्ष यांनी यावर नंतर विचार करू असे आश्वासन दिले.)

८)  सत्र बदल: सत्र हे पूर्वीप्रमाणे १  जुलै ते ३१ डिसेंबर आणि १  जानेवारी ते ३०  जून यानुसार वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचे नियोजन राहील. परीक्षा या वेळेवर कोणत्याही दिरंगाई शिवाय घेण्याबाबत चर्चा झाली. (सत्र पुढे जाऊ नये यासाठी), ९)  परीक्षेत सुरुवातीला विद्यार्थ्यांना ट्रायल पॅसेज हे कंपलसरी दिला जाईल. म्हणजेच तात्पर्य असे कि ३  मिनिटाचा ट्रायल पॅसेज टाइप केल्यानंतरच विद्यार्थ्याची मुख्य परीक्षा ही सुरु होईल. ट्रायल पॅसेज टाइप केल्यावरच पुढील सेक्शन सुरु होतील. म्हणजे परीक्षेला वेळेच्या आधी उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला ट्रायल पॅसेज हे परीक्षा सुरु होणेच्या आधी मिळेलच, १०)  जीसीसी-टीबीसी परीक्षेत होणारे सर्व गैरप्रकार/अनधिकृत प्रकार थांबवणेसाठी/रोखण्यासाठी संघटना आणि परीक्षा परिषद यांचे कडून आवश्यक ते सर्व उपाय योजना करणेबाबत महत्व पूर्ण चर्चा झाली. ११) ऑनलाईन लघुलेखन परीक्षेतील मार्किंग सिस्टीमबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली. विशेषतः उच्चश्रेणी/HIGHER PROFICIENCY मराठी आणि इंग्रजी लघुलेखन परीक्षेतील मार्किंग सिस्टीम तसेच पेपर तपासण्याची पद्धत, गुणदान बाबतीत चर्चा झाली. यात प्रामुख्याने लघुलेखन तज्ज्ञ नाईक सर, सौ. थिटे मॅडम आणि आ. सौ.हेमलताताई ढमढेरे मॅडम यांनी संघटनेकडून विद्यार्थी हितावह अध्यक्षसो आणि आयुकत मॅडम यांच्याकडे काही मागण्या केल्या. त्यावर ऑनलाईन वेबसाईट वर ऑनलाईन लघुलेखनचे मागील काळात झालेले सर्व पेपर MSCE वेबवर अपलोड करण्याबाबत अध्यक्षसो यांनी मागणी मान्य केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्लेइंग इलेव्हनचा अंदाज, हेड-टू-हेड, खेळपट्टीचा अहवाल, चेन्नई हवामान अपडेट

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडसोबत एमएस धोनी. (पीटीआय फोटो)" decoding="async" fetchpriority="high"/>चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रुतुराज गायकवाडसोबत एमएस धोनी. (पीटीआय फोटो) चेन्नई सुपर...

मुंबईत खारचे झाड कोसळले: एका आठवड्यानंतर ब्रेन-डेड तरुणाचे निधन; बिल्डरवर निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल

मुंबई : खारमध्ये ऑटोवर झाड पडून आठवडाभरानंतर गंभीर जखमी झालेल्या आरिका श्रीवास्तव या तरुणीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ॲपनिया चाचणीनंतर गुरुवारी डॉक्टरांनी...

अटक टाळण्यासाठी पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी दोघांना हवे होते

पुणे : गेल्या आठवड्यापासून गोळीबार प्रकरणात पोलिसांना हवा असलेल्या दोन जणांनी शनिवारी संध्याकाळी शिरूर तालुक्यातील सोनसांगवी गावात शहरापासून सुमारे 60 किमी अंतरावर...

जान्हवी कपूरचे घर समकालीन डिझाइनमध्ये व्यक्तिमत्त्व जोडण्याबद्दल आहे: कला प्रेरणा तुम्ही दूर करू शकता

काही घरे संस्मरणीय वाटतात कारण ती केवळ शैलीनेच सजलेली असतात. ते प्रत्येक कोपऱ्यात मूड, व्यक्तिमत्व आणि विचार आणि आपलेपणाची भावना घेऊन जातात.अभिनेत्री जान्हवी कपूरचे...

शिरवाटा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दोन इंजिनीअर विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

लोणावळ्याजवळील शिरवाटा धरणाच्या पाण्यामध्ये दोन इंजिनीअर विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला पुणे : मावळ तालुक्यातील सहा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी वीकेंडला फिरायला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा लोणावळ्याजवळील...

error: Content is protected !!