Homeशिक्षण-प्रशिक्षणकौशल्य २०२५ - राज्यस्तरीय स्पर्धा (महाराष्ट्र) परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच संस्थाचालकांचा...

कौशल्य २०२५ – राज्यस्तरीय स्पर्धा (महाराष्ट्र) परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच संस्थाचालकांचा सत्कार सोहळा व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

नागपूर दि.३ ( प्रमोद दळवी )  : युनिव्हर्सल ऑर्गनायझेशन ने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली “STATE LEVEL COMPETITION (MAHARASHTRA) : KAUSHALYA 2025 – Computer Typing Speed & Computer Skill Contest” जून आणि जुलै 2025 च्या काळात ऑनलाइन पद्धतीने संस्थेच्या होम सेंटरवर घेतली होती. या स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच संस्थाचालकांचा व मान्यवरांचा सत्कार सोहळा व बक्षीस वितरण समारंभ “सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल (ऑडिटोरियम), नागपूर” येथे नुकताच यशस्वीपणे पार पडला.  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना जवळपास “६५०  सन्मानचिन्ह ट्रॉफी तसेच राज्यस्तरीय प्रमाणपत्र” देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सत्कार सोहळा आटोपल्यानंतर सगळ्यांनी स्नेहभोजनाचा आनंदही घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. कांचनताई नितीनजी गडकरी (सामाजिक कार्यकर्त्या आणि प्रयोगशील शेतकरी ) , श्रीकांतजी आगलावे (महामंत्री, भारतीय जनता पार्टी, नागपूर शहर) , सौ. मनीषाताईच. अतकरे( महामंत्री भाजपा महिला, नागपूर शहर मा. सभापती तसेच मा. नगरसेवक) ,मा. सौ. अवंतिकाताई लेकुरवाले ( संचालक श्री गजानज ग्रुप संस्था तसेच माजी सभापती ). श्री. कश्यप सावरकर (विस्तार अधिकारी सावनेर विभाग) , शीतल पीटर मॅडम (मुख्याध्यापिका, सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कूल, सिव्हिल लाइन्स, नागपूर ), श्री अशोक पिलाजी चौधरी सर (अध्यक्ष, दि नीलडोह सहकारी पतसंस्था मर्यादित, नागपूर ), श्री. जितेंद्र वासनिक (चेअरमन, नागपूर सिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि., नागपूर) , श्री. राहुल प्रकाश आसरे (लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ता तसेच संस्थापक आसरे ज्वेलर्स ) , सौ. दिशाताई चणकापुरे (माजी सभापती कामठी विभाग ), श्री अनिलजी सबळ ( संगीतज्ञ तसेच व्यावसायिक सरकारी अधिकारी) .अमोल पुरुषोत्तम पुरकर (NCC अधिकारी महाराष्ट्र BN ANO. विद्या भवन हायस्कूल नवकन्या नगर भरतवाडा रोड नागपूर) , आशिष दैणे सर ( आशिष सर अकादमी बोरगाव, नागपूरचे संचालक) , श्री. फैसल खान इनायतुल्ला खान (प्रभारी, शिक्षण आणि विकास श्री चैतन्य अकादमी – आयएल) हे उपस्तीत होते .त्यांचे युनिव्हर्सल ऑर्गनायझेशन चे संचालक अशोक पिलाजी चौधरी सर, श्री गौरव गंगाधर कावळे सर, श्री अभिषेक अनिल सबळ सर यांनी आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन शैलेश पाटील सर (सल्लागार असे सामाजिक कार्यकर्ते) यांनी केले .तर प्रस्तावना गौरव गंगाधर कावळे संचालक (सिटीब्रिज सॉफ्टवेअर आणि युनिव्हर्सल ऑर्गनायझेशन) व आभार शबनम हुसैन मॅडम यांनी प्रकट केले

युनिव्हर्सल ऑर्गनायझेशन तसेच कौशल्य कार्यक्रमाचे प्रशांत पाखिडे(आर्य कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, नागपूर), मितेशकुमार नागपुरे (मॉडर्न कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, नागपूर), जितेंद्र डोंगरे ( प्रार्थना फाउंडेशन, नागपूर ), प्रमोद कलोडे ( गुरुकुल कॉम्प्युटर अकादमी, नागपूर), अभिजीत गिरजापुरे (सुपरनोव्हा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, नागपूर), सचिन बांगडे (नोव्हेल कॉम्प्युटर अकादमी, नागपूर), रूपेश वेलेकर ( एक्सपर्ट्स कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, नागपूर),सौ. स्वाती मनोज जैन (स्वाती कॉम्प्युटर, नागपूर),सौ. शारदा सुशील हरोडे ( गोपिका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, नागपूर), रवी जग्गु साहू ( वैशाली कॉम्प्युटर ट्रेनिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, नागपूर), महादेव शेंडे (आईसाहेब कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, खापरखेडा) हे सभासद असून सर्व सभासदांचे युनिव्हर्सल ऑर्गनायझेशन टीम तर्फे कौशल्य उपक्रमात प्रत्येक वर्षी योगदान मिळत असते त्यांचे युनिव्हर्सल ऑर्गनायझेशन आभार व्यक्त केले.

युनिव्हर्सल ऑर्गनायझेशन

युनिव्हर्सल ऑर्गनायझेशन यांनी “राज्यस्तरीय स्पर्धा (महाराष्ट्र) संगणक ज्ञान कौशल्य व टंकलेखण गती स्पर्धा (जून २०२५)” ०१ ते ३० जून २०२५ च्या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने संस्थेच्या होम सेंटर वर महाराष्ट्रात जवळपास ३२५ संस्थेत आयोजित केली होती. या स्पर्धेत एकूण १३,२२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, परीक्षा हि (संगणक टंकलेखन गती स्पर्धा) विषय- इंग्रजी, मराठी तसेच (संगणक ज्ञान कौशल्य) विषय-एम. एस. ऑफिस, डी.टी.पी., टॅली, सी प्रोग्रामिंग व इतर विषयात घेण्यात आली होती.

“युनिव्हर्सल ऑर्गनायझेशन” ही एक सामाजिक व शैक्षणिक संस्था असून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत आहे. शिक्षण, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसमावेशक विकास या मूल्यांवर आधारित उपक्रम राबविणे हा त्यंचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी, युवक तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांद्वारे जागरूकता निर्माण करणे, कौशल्यविकास करणे व समाजहिताचे कार्य करणे हे त्यांचे ध्येय आहे. गेल्या १५ वर्षांपासून विश्वासार्ह आणि दर्जेदार संगणक शिक्षण देत आहोत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणं, त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणं आणि उज्वल करिअरसाठी तयार करणं, हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. “सर्वांसाठी शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण” हा आमचा ध्येयवाक्य असून समाजात शिक्षणाद्वारे प्रगती व विकास घडविणे हेच आमच्या ट्रस्टचे ध्येय आहे असे आयोजक गौरव कावळे (व्यवस्थापकीय संचालक) अभिषेक सबळ (तांत्रिक संचालक) यांनी सांगितले.

युनिव्हर्सल ऑर्गनाईझेशन तसेच कौशल्य उपक्रमाचे प्रमुख उद्देश्य

युनिव्हर्सल ऑरगॅनिझशनचे प्रमुख उद्देश्य विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सॉफ्टवेअरद्वारे सरावाची सुविधा पुरवणे आणि त्यांना अधिकाधिक सक्षम करणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. त्यांचा  उद्देश विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सॉफ्टवेअर प्रॅक्टिसची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. “KAUSHALYA (2025) : STATE LEVEL COMPETITION (MAHARASHTRA) – COMPUTER KNOWLEDGE SKILL & TYPING SPEED CONTEST” या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल, अभ्यासाची सवय लागेल आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल अधिक सुलभ होईल. विद्यार्थी आमचे आधुनिक व उपयुक्त कोर्सेसचा अभ्यास करून परीक्षा देऊ शकतात आणि त्यांना अधिकृत प्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्रामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो व उज्ज्वल भविष्याची दारे खुली होतात असे गौरव कावळे (व्यवस्थापकीय संचालक) अभिषेक सबळ (तांत्रिक संचालक) यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कबाला की फिफाचे नियम? मेस्सीचा अर्जेंटिना इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीसाठी ‘लकी’ नेव्ही ब्लू जर्सी...

जॉर्डन विरुद्ध नेव्ही ब्लू जर्सीमध्ये लिओनेल मेस्सी (प्रतिमा: एक्स) गतविजेता अर्जेंटिना FIFA विश्वचषक 2026 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडबरोबर आणखी एक ब्लॉकबस्टर शत्रुत्वासाठी सज्ज...

व्हिएतनाम स्पीडबोट दुर्घटना: 15 भारतीय पर्यटकांचे पार्थिव आज मायदेशी रवाना

मुंबई: व्हिएतनामच्या फु क्वोक बेटावर गेल्या आठवड्यात झालेल्या स्पीडबोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १५ भारतीय नागरिकांचे पार्थिव मंगळवारी सहा देशांतर्गत उड्डाणांनी मुंबईहून त्यांच्या...

‘मेरी पूरी दुनिया चली गई’: केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून न्याय...

केतन अग्रवालच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक भावनिक पत्र लिहिले आहे पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालची आई राखी अग्रवाल हिने पंतप्रधान नरेंद्र...

काचेची त्वचा हवी आहे? नैसर्गिकरित्या निरोगी, चमकदार त्वचेसाठी दररोज ही 5 पेये पिणे सुरू...

हे रंगीबेरंगी पेय सौंदर्य प्रेमींमध्ये आणि चांगल्या कारणास्तव आवडते बनले आहे.गाजरात बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते, तर बीटरूटमध्ये अँटिऑक्सिडंट, फोलेट आणि व्हिटॅमिन सी असते. त्वचेचे...

मोशी शोकांतिका: PCMC ने डब्ल्यूटीई प्लांट प्रकल्प प्रमुख, सुरक्षा अधिकारी दोषी हत्येचा गुन्हा दाखल...

कचऱ्याच्या ढिगाऱ्याने प्रशासकीय इमारतीतील अनेक कामगार अडकून पडल्याची भीषण घटना उघडकीस आली. पुणे: मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ जणांचा बळी गेल्याच्या पाच दिवसांनंतर...

error: Content is protected !!