Homeशहरभावी शिक्षकांना शैक्षणिक साधननिर्मितीचे प्रशिक्षण : ज्ञानगंगा बी.एड. महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

भावी शिक्षकांना शैक्षणिक साधननिर्मितीचे प्रशिक्षण : ज्ञानगंगा बी.एड. महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न

ठाणे दि. ३ ( प्रमोद दळवी )  : ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट संचालित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड.), ठाणे येथे ‘Preparing Learning Resources’ (शैक्षणिक साधने तयार करणे) या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनचे समन्वयक प्रदीप कसुर्डे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रथम वर्ष बी.एड.च्या विद्यार्थी-शिक्षकांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. कार्यशाळेच्या समन्वयक सहाय्यक प्राध्यापिका डॉ. कविता कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. सविता उपासनी यांच्या हस्ते प्रदीप कसुर्डे यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक प्राध्यापिका प्रा. प्रतिभा कांबळी आणि सौ. सुरभी सोना यांचीही प्रमुख उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनात कसुर्डे यांनी अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच POSH Act आणि POCSO Act संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. अध्यापनात शैक्षणिक साधनांचे महत्त्व, कमी खर्चात प्रभावी अध्यापन साहित्य तयार करण्याच्या पद्धती, तसेच विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी Learning Resources चा प्रभावी वापर कसा करावा, याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थी-शिक्षकांचे गट तयार करून विविध कृतींच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधने तयार करून घेण्यात आली. संवादात्मक पद्धतीने प्रश्नोत्तरांचे सत्र घेऊन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या प्रत्यक्ष कृतींमुळे विद्यार्थी-शिक्षकांमध्ये सर्जनशीलता, अध्यापन कौशल्य, आत्मविश्वास आणि प्रभावी शैक्षणिक साधने तयार करण्याची क्षमता विकसित झाली. ही कार्यशाळा अत्यंत ज्ञानवर्धक, उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरली. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी-शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. शेवटी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक आणि विद्यार्थी-शिक्षकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

टीईटी आता सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, परीक्षा ऑनलाइन होऊ शकते

मूल्यांकनासाठी उपस्थित असलेले शिक्षक पुणे : संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पुन्हा सुरू करावी लागेल आणि ताबडतोब चाचणी घेणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर राज्यात शिक्षक...

क्रोएशिया विरुद्ध पोर्तुगालमधील व्हीएआर निर्णयाच्या नाटकावर फिफाने मौन सोडले, उशीरा बरोबरी का नाकारली गेली...

क्रोएशियाचा पेटार सुसिक (17) आणि सहकाऱ्यांनी विश्वचषक फेरीच्या 32 मध्ये झालेल्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. (एपी फोटो/माईक स्टीवर्ट) पोर्तुगाल विरुद्ध FIFA विश्वचषक 2026 मधून...

मुसळधार पावसात मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावरील मोकळ्या मॅनहोलमध्ये फोनवर पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू; 4 अधिकाऱ्यांचे खंडपीठ...

मुंबई: चेंबूरमध्ये झाड कोसळून एका 11 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याच्या दोनच दिवसांनंतर, अस्लम इसाक शेख या 55 वर्षीय व्यक्तीचा साकीनाका येथे...

केतन अग्रवालच्या हत्येशी संबंधित कपडे पुणे पोलिसांनी जप्त केल्याने सिया गोयलने मधले बोट दाखवले

तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोपी सिया गोयल हिने कथितपणे मधले बोट दाखवले. पुणे : तिचा मंगेतर आणि रिअल्टर केतन अग्रवालच्या...

पालकत्वाच्या चुका: वयाच्या 10 वर्षापूर्वी या गोष्टी न केल्याबद्दल पालकांना पश्चाताप होतो

किशोरवयीन किंवा प्रौढ मुलांच्या पालकांना विचारा की त्यांनी वेगळ्या पद्धतीने काय केले असते आणि त्यांची अनेक उत्तरे आश्चर्यकारकपणे सारखीच वाटतात. ते क्वचितच...

error: Content is protected !!