Homeशहरदत्तक गावातील शाळेत स्वच्छता अभियाना अंतर्गत संपर्क उपक्रमाचे आयोजन

दत्तक गावातील शाळेत स्वच्छता अभियाना अंतर्गत संपर्क उपक्रमाचे आयोजन

ठाणे दि.८ : ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट’स कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड.) ठाणे, महाविद्यालयाच्या वतीने पानखंडा (ओवळे) गावातील  ठाणे महानगरपालिका शाळा क्र . ५९, या शाळेतील इयत्ता ५ वी ते ८ वी विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग घेऊन बी.एड.महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष विदयार्थी शिक्षकांनी (outreach activity) संपर्क उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

या उपक्रमात प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष विदयार्थी शिक्षकांनी स्वच्छता अभियानाअंतर्गत एक छोटीशी नाटिका सादर केली.  ज्यात ओला कचरा ,सुका कचरा, व घातक कचरा याचे प्रात्यक्षिक विद्यार्थी शिक्षकांनी सादर करून दाखवले. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांना देखील नाटिकेतील विविध गोष्टी ओळखण्यास सांगितले , शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दाखविल्यामुळे त्यांनी देखील स्वच्छतेचे महत्व स्वतःहून सांगितले. त्यानंतर वर्गात शालेय विद्यार्थ्यांना स्व स्वच्छतेसंबंधी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेनुसार स्व स्वच्छतेसंबंधी चित्र काढण्याचा चांगलाच प्रयत्न केला.या उपक्रमादरम्यान पानखंडा (ओवळे) गावातील  ठाणे महानगरपालिका शाळा क्र . ५९, शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा भरसट सर व त्यांचे सहकारी यांनी खूप सहकार्य केले. तसेच ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट’स कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड.) ठाणे, महाविद्यालयाच्या वतीने संपर्क उपक्रम सहकारी शिक्षिका श्रीम . प्रतिभा कांबळी मॅडम यांनी उपक्रमासंबंधित सूत्र संचालन केले. व महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सविता उपासनी मॅडम यांनी शाळेचे , मुख्याध्यापकांचे ,उपस्थित सर्वांचे आभार मानले. ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट’स कॉलेज ऑफ

एज्युकेशन(बी.एड.) ठाणे, महाविद्यालयातील  प्रथम वर्ष व  दितीय वर्षाच्या विद्यार्थी शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी दिवाळीचे औचित्य लक्षात ठेवून दिवे व  आकाश कंदील शाळेला भेट स्वरूपात दिले. त्यावेळी ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट’स चे PRO सर अनिल आठवले सर , ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्ट’स कॉलेज ऑफ एज्युकेशन(बी.एड.) ठाणे, महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सविता उपासनी मॅडम,इतर शिक्षकवृद सौ. रचना दास, सौ. सुरभी सोना,डॉ . कविता कांबळे , शिपाई ज्ञानेश्वर प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष विद्यार्थी शिक्षक या सर्वांच्या उपस्थित संपर्क उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची...

उल्हासनगर दि .२९ ( प्रमोद दळवी ): महाराष्ट्र विधानमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कुमार आयलानी  यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती...

‘हूडी टू टी-शर्ट’: पोलिसांचा दावा आहे की चेतन चौधरीने केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपास...

पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवाल खून प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून तपास टाळण्यासाठी चेतन चौधरीने लोहगड किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याचे स्वरूप...

‘वैभव सूर्यवंशी तयार आहे, पण…’: भारताचे प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी किशोरवयीन व्यक्तींसह संयम...

वैभव सूर्यवंशी (पीटीआय फोटो) नवी दिल्ली: भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोस्चेट यांनी किशोरवयीन फलंदाजी खळबळजनक वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार असल्याचे...

मुंबई मान्सून : उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस; अनेक भागात 100 मिमी पेक्षा जास्त नोंद...

रात्रभर मुसळधार पावसानंतर मुंबई कोस्टल रोडवरील दृश्य मुंबई: मुंबईच्या उपनगरांमध्ये सोमवारी रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली, अनेक भागात अवघ्या चार तासांत 100 मिमीपेक्षा...

केतन अग्रवाल खून प्रकरण: चेतन चौधरी स्कूटरवरून लोहगड किल्ल्यापर्यंत 90 किमी चालला – त्याने...

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चेतन (एल) यांनी 18 जून रोजी पुण्याहून प्रवासासाठी जाणूनबुजून स्कूटर निवडली कारण त्याला टोल प्लाझा रेकॉर्डवरून कार सापडण्याची भीती होती. पुणे:...

error: Content is protected !!