Homeशहरतारेच्या कुंपणाला लावलेल्या फासात अडकून बिबट्याचा मृत्यू : बदलापूर मधील आंबेशिव गावातील...

तारेच्या कुंपणाला लावलेल्या फासात अडकून बिबट्याचा मृत्यू : बदलापूर मधील आंबेशिव गावातील घटना

बदलापूर  दि. ३ ( प्रमोद दळवी ) : बदलापूर जवळच्या आंबेशिव गावात एका तारेच्या कुंपणाला लावलेल्या फासात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शिकारीसाठी लावलेल्या फासात बिबट्या अडकण्याची जोरदार चर्चा असल्याने बिबट्याच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत .

आंबेशिव गावाजवळच्या जंगलात रामगिरी आश्रम असून या आश्रमाला तारेचे कुंपण आहे आणि या कुंपणाला एका ठिकाणी वन्य प्राण्यासाठी फास लावण्यात आला होता. या फासात दोन दिवसांपूर्वी बिबट्या अडकला आणि त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान  बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून त्याचे शिवविच्छेदन केले आहे. अद्याप शवविच्छेदन अहवाल आलेला नसून या अहवालात बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे बिबट्याच्या शवविच्छेदन अहवालात कोणती माहिती पुढे येते हे महत्वाचे ठरणार आहे. हा बिबट्या दोन वर्षाचा मांदी जातीचा असल्याची माहिती समोर आली आहे. जंगलाला लागून असलेल्या भागात परवानगी नसतानाही वन्य प्राण्यांसाठी असे फासे लावले जातात त्यात अडकून आता बिबट्याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढला आहे. या घटनेबाबत  बदलापूरचे आर. एफ. ओ धार्वणे यांना विचारणा केल्या असता त्यांनी सांगितले त्या ठिकाणी तारेचे कुंपण तुटलेले होते व त्या कुंपणाला कोणीतरी लावलेला फासात बिबट्या अडकून मृत्यू झाला आहे. याचा आम्ही तपास करीत असून नक्कीच यासंदर्भात कारवाई  केली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘ती दोषी असेल तर तिला त्याच गडावरून फेकून द्या’; केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी...

व्यापारी केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयलची आई पूजा गोयल यांनी गुरुवारी आपल्या मुलीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे: व्यापारी...

नोएडा विरुद्ध युरोप: ‘नोएडा युरोपपेक्षा चांगला आहे’: भारतीय प्रवाश्यांच्या वक्तव्यामुळे स्वीडन, जर्मनी आणि ऑस्ट्रियावर...

इंस्टाग्रामवर एका भारतीय प्रवाशाची युरोपियन ठिकाणांबद्दलची वैयक्तिक पोस्ट व्हायरल होत आहे. परंतु प्रवासी अनमोल रैना (@anmolraina13) च्या व्हिडिओने “नोएडा युरोपपेक्षा चांगले आहे”...

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

इक्वेडोर विरुद्ध जर्मनी फिफा विश्वचषक 2026 मॅच हायलाइट्स: इक्वाडोर 2-1 जर्मनी; लवचिक इक्वाडोरने आळशी...

इक्वाडोर वि जर्मनी लाइव्ह स्कोअर: टीम न्यूज: जर्मनीसाठी मोठ्या तोफा परतल्या; Caicedo इक्वेडोर आघाडीवर आहेअधिकृत लाइनअप संपले आहेत आणि दोन्ही व्यवस्थापक आज रात्री कोणतेही...

एअरबॅग तैनातीमुळे मुंबईजवळ पार्क केलेल्या कारमध्ये 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला

स्टीयरिंग व्हील एअरबॅग केसिंग कथितपणे पीडितेला उच्च तीव्रतेने आदळले, ज्यामुळे गंभीर जखमा झाल्या आणि स्थिर वाहनाच्या आत प्राणघातक रक्तस्त्राव झाला मुंबई: मीरा रोड...

error: Content is protected !!