Homeशहरज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून “मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्ञानगंगा नर्सिंग विभागाने विविध...

ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून “मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्ञानगंगा नर्सिंग विभागाने विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले”

ठाणे दि.१४ : ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टचे नर्सिंग महाविद्यालय (जी.एन.एम.), ठाणे येथे दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी डीजीईटी ऑडिटोरियममध्ये “मराठी भाषा गौरव दिन” मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमानाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती तपस्या नेवे, ग्रंथपाल, अंबरनाथ नगर परिषद संचालित शिव प्रेरणा ग्रंथालय व साहित्य संशोधन केंद्र, अंबरनाथ या उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह प्राप्त झाला. कार्यक्रमात नर्सिंग विभागातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे सादरीकरण केले. यामध्ये मराठी कविता, भारूड, गाणी तसेच नृत्य सादरीकरणांचा समावेश होता. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी मराठी संस्कृतीची समृद्ध परंपरा आणि कलात्मक अभिव्यक्ती प्रभावीपणे सादर केली.तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी “पोवाडा” या लोककलेचे सामूहिक सादरीकरण केले. या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्यगाथेची प्रभावी झलक प्रेक्षकांसमोर उभी राहिली. पोवाडा सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्या सौ. कल्याणी तेजे यांनी प्रभावीपणे केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानगंगा नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शशिकला थोटा, तसेच ज्ञानगंगा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सविता उपासनी आणि जनसंपर्क अधिकारी (PRO) प्रा. अनिल आठवले यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा शाल, तुळशीचे रोप आणि स्नेहभेट देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्या श्रीमती तपस्या नेवे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व, वाचनसंस्कृतीची गरज आणि साहित्याशी नाते जोडण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अधिक अभिमान निर्माण झाला.कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीविषयी आदर व अभिमानाची भावना अधिक दृढ झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई रेल्वे स्थानकावर महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला अटक

मुंबई : बोरिवली रेल्वे स्थानकावर महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून सरकारी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) एका ५५ वर्षीय व्यक्तीला मंगळवारी अटक केली. पोलिसांनी...

कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार (मरणोत्तर) देण्याच्या नव्या याचिकेवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना मागवा: हायकोर्टाने...

कोल्हापूर : भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते दिवंगत खाशाबा जाधव यांना पद्म पुरस्कार (मरणोत्तर) बहाल करण्याबाबत नवीन प्रक्रिया सुरू करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या...

IPL 2026: संजू सॅमसनच्या 87* विरुद्ध DC मॅच-विनिंगवर 5 तज्ञांच्या प्रतिक्रिया

चेन्नई सुपर किंग्जचा संजू सॅमसन (एपी फोटो/मनीष स्वरूप) नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर IPL 2026 च्या 48 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला दिल्ली...

डेन्व्हर विमानतळ पेंटिंग्ज: डेन्व्हर विमानतळाच्या आत कला आणि चित्रे: त्यांचा खरोखर अर्थ काय आहे?...

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळाची आकर्षक भित्तिचित्रे कुतूहल वाढवतात. कलाकार लिओ टँगुमा यांच्या कार्यात शांतता आणि पर्यावरणविषयक समस्यांचे चित्रण आहे. एक भित्तिचित्र निसर्गाच्या आशादायक दृष्टीसह...

किडनी प्रत्यारोपणाचे आश्वासन देत उल्हासनगरातील एका दांपत्याची ३१ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक :...

उल्हासनगर दि. ६ ( प्रमोद दळवी ) : पतीची किडनी खराब झाल्याने त्यांना किडनी ट्रान्सफर साठी डोनर मिळून देतो तसेच त्यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशन...

error: Content is protected !!